मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये साजरा झाला चक्क गुंडाचा वाढदिवस, 5 पोलीस निलंबीत

मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये साजरा झाला चक्क गुंडाचा वाढदिवस, 5 पोलीस निलंबीत

या प्रकरणी दोन पोलीस उप-निरीक्षक आणि तीन हवालदारांना निलंबित करण्यात आलंय. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सध्या चौकशी सुरू आहे.

  • Share this:

मनोज कुलकर्णी, मुंबई 31 जुलै : मुंबईतल्या पोलिसांचा दरारा सर्व देशात आहे असं मानलं जातं. मात्र मुंबईतल्या भांडुप पोलीस स्टेशनमध्ये एक संतापजनक प्रकार घडलाय. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी चक्क एका गुंडाचा वाढदिवस साजरा केला. अयान खान असं या गुंडाचं नाव आहे. त्याचा वाढदिवस चक्क पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये साजरा करण्यात आला. या प्रकरणी दोन पोलीस उप-निरीक्षक आणि तीन हवालदारांना निलंबित करण्यात आलंय. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सध्या चौकशी सुरू आहे.

हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है - मुख्यमंत्री

गृहमंत्रालय, राज्यांच्या पोलिसांचं मुख्यालय सर्व ज्येष्ठ अधिकारी अशी सगळी मंडळी मुंबईत असल्याने इथल्या पोलीस स्टेशन्स मध्ये कायम सतर्कता असते. मात्र भांडुपच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सर्व हद्द ओलांडत गुंडाचाच वाढदिवस साजरा केला आणि तोही चक्क अधिकाऱ्याच्या केबीनमध्ये. आयान खान हा भांडुप परिसरात राहणारा गुंड आहे. 23 जुलैला  त्याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस  भांडुप पोलीस ठाण्यातच एका अधिकार्‍याच्या केबिनमध्ये केक कापून साजरा करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

साथ लढेंगे! EVMविरुद्धच्या मोर्च्यात राज ठाकरेंचं 'दीदीं'ना मुंबईत येण्याचं आवतन

अयान खानवर 2016 पूर्वी गुन्हे दाखल होते. आता त्यातून तो सुटला आणि एका गुन्ह्या संदर्भात पोलिसांनी बी समरी केली होती. निलंबित केलेल्या पाच पोलिसांची चौकशी सुरू झालीय. यात दोन पीएसआयचाही समावेश आहे. शहरात गुंडगीरी वाढत आहे असं असताना गुन्हेगारांवर वचक ठेवायचं सोडून पोलीसच जर असं वागत असतील तर गुन्हेगारांना धाक कसा बसणार असा सवाल विचारण्यात येतोय.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 31, 2019, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading