खळबळजनक! ठाणे शहरात झळकले छोटा राजनच्या वाढदिवसाचे बॅनर्स

खळबळजनक! ठाणे शहरात झळकले छोटा राजनच्या वाढदिवसाचे बॅनर्स

ठाण्यात राजेंद्र सदाशिव निकाळजे म्हणजेच छोटा राजन या गुंडाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे, 12 जानेवारी : ठाणे शहरातील गडकरी रंगायतन समोरील बस स्टॉपवर नाना ऊर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे म्हणजेच छोटा राजन (chota rajan) या गुंडाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. 'सी.आर. सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य' यांच्याकडून मध्यरात्री गुपचूप छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

वाढदिवसानिमित्त नेते किंवा अभिनेत्यांचे बॅनर्स लागणं काही नवं नाही. पण आता ठाण्यात चक्का गुंडाला वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी बॅनर्स लावण्यात आले आहेत. 13 जानेवारीला छोटा राजन याचा वाढदिवस असल्याचं म्हणत त्याला बॅनर्सद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनर्सवर शुभेच्छुक श्री प्रकाश भालचंद्र शेलटकर अध्यक्ष ठाणे शहर तसेच संगीता ताई शिंदे, ठाणे शहर महिला अध्यक्ष आणि राजाभाऊ गोळे, मुंबई शहर अध्यक्ष त्याचबरोबर हेमचंद्र उर्फ दादा मोरे संस्थापक-अध्यक्ष अशा व्यक्तींनी छोटा राजनला बॅनर्स लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

छोटा राजनला शुभेच्छा देणारा हा बॅनर ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे एका बस स्टॉपवर लावण्यात आला आहे. एका वरिष्ठ पत्रकाराच्या हत्येप्रकरणी आरोप असलेला आणि तसंच इतर हत्या,खंडणी, धमकावणे अशा अनेक गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांत छोटा राजन फरार होता. ज्याच्या मुसक्या काही महिन्यांपूर्वी परदेशात आवळण्यात आल्या होत्या.

क्रेटा गाडीचा पाठलाग करून फिल्मी स्टाईल गोळीबार, व्यापारी जागीच ठार

सध्या छोटा राजन हा देशातील सर्वात मोठ्या आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार जेलमध्ये बंद असून त्याच्यावर आरोप असलेल्या अनेक प्रकरणात छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो सुनावणीस हजर राहतो. अशा छोटा राजन याच्या वाढदिवसाला ठाण्यात बॅनर्स लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आता पोलीस काही कारवाई करतात का, हे पाहावं लागेल.

कोण आहे छोटा राजन?

छोटा राजनचं खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. त्याचा जन्म 1960 मध्ये मुंबईमधील चेंबूरच्या टिळकनगर वस्तीत झाला. वयाच्या 10व्या वर्षी त्य़ाने चित्रपटाची तिकिटे ब्लॅकने विकण्याचं काम सुरू केलं. दरम्यान, तो राजन नायर टोळीत सामील झाला. गुन्हेगारीच्या जगात नायर ला 'बड़ा राजन' म्हणून ओळखलं जात होतं. राजेंद्र सदाशिव निकाळजे हा नायरचा उजवा हात होता, म्हणून लोक त्याला 'छोटा राजन' म्हणून ओळखायचे.

छोटा राजनवर अनेक फौजदारी गुन्हे दाखल आहेत. छोटा राजन नायर टोळीत असतानाच त्याच्यावर बेकायदेशीर वसुली, धमकी, प्राणघातक हल्ला आणि खुनाचा प्रयत्न अशी प्रकरणं यापूर्वीही नोंदली गेली होती. दाऊदसोबत सामील झाल्यानंतर त्याचा गुन्ह्यांचा आलेख वाढला. त्याच्याविरूद्ध अनेकांच्या हत्येची प्रकरणंही आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: January 12, 2020, 8:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading