मुंबई: क्षुल्लक कारणावरून आई भांडली, मुलाने वृ्द्ध जन्मदातीला संपवलं!

मुंबई: क्षुल्लक कारणावरून आई भांडली, मुलाने वृ्द्ध जन्मदातीला संपवलं!

एका व्यक्तीकडून जन्मदात्या आईची हत्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कल्याणध्ये हा प्रकार घडला आहे.

  • Share this:

कल्याण, 05 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्याचे प्रकार वाढले आहेत. गुन्ह्याचा असाच एक धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. एका व्यक्तीकडून जन्मदात्या आईची हत्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कल्याणध्ये हा प्रकार घडला आहे. आईशी झालेल्या किरकोळ वादातून राग अनावर झाल्यानंतर आरोपीकडून वृद्ध आईची हत्या करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण पश्चिमेच्या भोईवाडा भागातील गफूर मंझिल या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. रुकसाना मुल्ला असं हत्या कलेल्या आईचं नाव आहे तर अमन मुल्ला असं आरोपी मुलाचं नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोप अमनचं मानकिस संतूलन ठीक नसतं. अशात घरामध्ये आईशी किरकोळ कारणावरून वाद झाला. पण त्यावेळी अमनला राग अनावर झाला आणि त्याने आईची हत्या केली.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच, घटनास्थळावरून आईचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, मुलानेच हत्या केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांकडून अमनला ताब्यात घेण्यात आलं आहे.

शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अमनचं माथेफिरू आहे. त्याचं मानसिक संतूलन ठिक नसतं. या माहितीवरून आरोपी अमनची वैद्यकीय तपासणी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे, तर पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बाप्पाची आरती ठरली अखेरची, 10 वर्षाच्या चिमुकल्याला...

ऐन गणेशोत्सवात शिर्डीमध्ये बिबट्याच्या हल्ल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री लाडक्या बाप्पाची आरती करून घरी परत येत असताना बिबट्याने हल्ला करून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिर्डीतल्या राहाता तालुक्यातील कुरणपूर गावात हा प्रकार घडला आहे. अनेक दिवसांपासून बिबट्याचा या परीसरात धुमाकूळ सूरू आहे. पण, वनविभागाने वेळीच बंदोबस्त न केल्याने मुलाचा नाहक बळी गेल्याने नागरिक संतत्प झाले आहेत.

काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान राहाता तालुक्यातील कुरणपूर इथल्या देठे वस्तीवरची ही खळबलजनक घटना आहे. 10 वर्षीय दर्शन देठे हा गणपतीची आरती संपल्यानंतर आपल्या चुलती आणि इतरांसोबत घराकडे चाललेला असताना ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून दर्शनला ऊसाच्या शेतात ओढत नेल. आरडा-ओरड सुरू झाल्यानंतर परीसरातील नागरीक जमा झाले आणि दर्शनची ऊसाच्या शेतात शोधाशोध सुरू केली.

उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर गंभीर जखमी झालेला दर्शन हा सापडला. त्याला उपचारासाठी लोणी इथल्या प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी दर्शनचा मृच्यू झाल्याचं सांगितल्याने त्याच्या कुटूंबावर मोठा आघात झाला. घरातल्या मुलाला अशा पद्धतीने गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण परिसरातून यावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. गावात बिबट्याचा वावर असल्यामुळे गावात भीतीचं वातावरण होतं. याबद्दल वनविभागाला वारंवार माहिती देऊनही कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही. त्यामुळे गर्शनचा नाहक बळी गेला.

अनेक दिवसांपासून या परीसरात बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. आजवर शेतकऱ्यांच्या जनावरांना लक्ष करणाऱ्या बिबट्याने मुलाचा बळी घेतल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. या मुलाच्या मृत्यूस वनविभाग जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: murder
First Published: Sep 5, 2019 12:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading