भिवंडीमध्ये खळबळजनक घटना, चोर समजून नागरिकांनी घेतला तरुणाचा जीव

स्थानिक रहिवाश्यांनी चोर असल्याचा संशय घेऊन तरुणाला लाथा बुक्यांनी आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 09:50 PM IST

भिवंडीमध्ये खळबळजनक घटना, चोर समजून नागरिकांनी घेतला तरुणाचा जीव

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 17 जून : भिवंडीमध्ये चोर समजून एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कामगाराने मध्यरात्रीच्या वेळी सोसायटीच्या आवारात प्रवेश केल्याने नागरिकांनी पकडून त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल रात्री जुनी माऊली बिल्डिंग, अजंठा कंपाऊंड इथं घडली आहे.

जोखईप्रसाद रामचरित्र मोर्या उर्फ अभिषेक ( 28 रा.अकबर शेठ बिल्डिंग,अजंठा कंपाऊंड ) असं मारहाणीत मृत्यू झालेल्या कामगाराचं नांव आहे. सदर कामगार आलम शेठ यांच्याकडे सोफा सेटच्या कापडाच्या डिलिव्हरीचं काम करत होता. 11 जून रोजी त्याने अचानक शेजारच्या इमारतीच्या सोसायटीत प्रवेश केला. तो मध्यरात्री गेल्याने स्थानिक रहिवाश्यांनी त्याच्यावर चोर असल्याचा संशय घेऊन त्याला लाथा बुक्यांनी आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.

या मारहाणीमध्ये डोक्यावर बेदम उपटी लागल्याने तो काही क्षणातच बेशुद्ध पडला होता. या मारहाणीच्या घटनेची खबर भोईवाडा पोलिसांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला उपचारासाठी प्रथम उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारासाठी त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हेही वाचा : महिलेचे दिरासोबत होते अनैतिक संबंध, पतीने जीव जाईपर्यंत पत्नीवर केले चाकूने वार

Loading...

उपचार सुरु असतानाच मौर्या याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी माऊली सोसायटीमधील भरतभाई शंकरदास पटेल ( 50), संदीप रमन लाल शाह ( 38) आणि जतीन देवानंद हरीया ( 38) या तिघांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

या तिघांनाही न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास एपीआय टी.जी.जोशी करीत आहे. तर या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर जोखईप्रसाद अशा पद्धतीने गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

VIDEO : जागा तुम्ही निवडा, उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना ओपन चॅलेंज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 09:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...