भाजप खासदाराला झाला कॅन्सर, युवराज सिंगने घेतली भेट

भाजप खासदाराला झाला कॅन्सर, युवराज सिंगने घेतली भेट

युवराज सिंगनं घेतली कॅन्सरग्रस्त भाजप खासदारांची भेट

  • Share this:

मुंबई, 05 डिसेंबर : आक्रमक आणि तडाखेबाज फलंदाजीमुळे ओळखला जाणाऱ्या युवराज सिंगला 2012नंतर ‘फायटर किंग’ अशी ओळख मिळाली. त्याचे कारण म्हणजे 2011मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर युवराज सिंगला कॅन्सर झाल्याचे निर्दशनास आले होते. यासाठी युवराज वर्ल्ड कपनंतर अमेरिकेत उपचारासाठी रवाना झाला. युवराजच्या फुफ्फुस आणि हृदयाच्यामध्ये ट्युमर असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र कॅन्सरशी दोन हात करून युवीनं क्रिकेटमध्ये कमबॅक केले आणि कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘युवीकॅन’ नावाची संस्था स्थापन केली. कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या युवीनं आज मुंबईत आजारी असलेल्या भाजप खासदाराची भेट घेतली.

राज्यसभेचे खासदार अनिल बलूनी गेल्या दीड महिन्यांपासून मुंबईत उपचार घेत आहेत. कॅन्सर झाल्याचे त्यांनी स्वत: एका फेसबूक पोस्टमध्ये सांगितले होते. दरम्यान युवीनं अनिल बलूनी यांची भेट घेतल्यानंतर एक फोटो पोस्ट केला. यावर युवीनं, “तुम्ही आजाराशी सामोरे जात आहात. त्यामुळं आता तुम्ही नव्या जोमात आणि संकल्पनेने लोकांची सेवा कराल. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा", असे लिहिले.

वाचा-सामना सुरु असताना तो मैदानातच कोसळला; भारतीय क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकने मृत्यू!

वाचा-देवेंद्र फडणवीसांना दणका, निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयांना स्थगिती

दरम्यान अनिल बलूनी यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूकच्या माध्यमातून कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती. बलूनी यांनी फेसबुकवर एक भावनात्मक संदेश असलेली पोस्टही लिहिली होती. यात त्यांनी, “लवकरच मी निरोगी होईन आणि तुमच्या सर्वामध्ये येईन. मी लहानपणापासूनच संघर्ष करत आलो आहे. बरा होऊन मी उत्तराखंडच्या विकासासाठी घेतलेला संकल्प पूर्ण करीन. माझ्या आरोग्यासाठी शुभेच्छा देणार्‍या हितचिंतकांचे मी आभार मानतो”, अशी भावनात्मक पोस्ट लिहिली होती.

वाचा-पोलिस अधिकाऱ्याचा फोटो होतोय व्हायरल, युझर म्हणाले ‘तूच खरा सिंघम!’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा खासदारांना गाव दत्तक घेण्यास सांगितले होते तेव्हा अनिल बलूनी यांनी निर्जिव अशा उत्तराखंड येथील बौरा गाव दत्त घेतले. त्यांच्या या निर्णयामुळे बलूनी चर्चेत आले होते. बलूनी यांनी दत्तक घेतलेल्या गावाला आजही भुतांचे गाव म्हंटले जाते. मात्र तरी बलूनी यांनी दत्तक घेतलेल्या या गावात लोकांना राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. दरम्यान बलूनी यांच्यावर उपचार सुरू असून लवकरच ते दिल्लीला रवाना होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2019 07:21 PM IST

ताज्या बातम्या