मुंबईत क्रिकेटपटूच्या हत्येनं खळबळ, मैत्रीण पोलिसांच्या ताब्यात

क्रिकेटपटूच्या हत्येनंतर भांडूपमध्ये खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 10:07 AM IST

मुंबईत क्रिकेटपटूच्या हत्येनं खळबळ, मैत्रीण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई, 7 जून :  भांडुपमध्ये एका युवा क्रिकेटपटूची चाकून भोसकून हत्या करण्यात आली आहे. राकेश पवार असं या क्रिकेटपटूचं नाव असून तीन जणांनी त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत राकेश पवारच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं आहे.

राकेश पवार हा गुरुवारी रात्री आपल्या दुचाकीवरून घरी जात होता. वाटेत 3 जणांनी त्याला काहीतरी कारण काढून थांबवलं. अडवणारे तीनही जण राकेशच्या ओळखीचेच असल्याची माहिती आहे. या तीन जणांनी चाकूने भोसकून राकेशची हत्या केल्याची माहिती आहे. तीनही अज्ञात आरोपी राकेशची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

क्रिकेटपटूच्या हत्येनंतर भांडूपमध्ये खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र जुन्या वादातूनच हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी राकेश पवार याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, राकेश पवार जिल्हास्तरावर क्रिकेट खेळत होता. याशिवायच क्रिकेट प्रशिक्षकही म्हणूनही काम करत होता.

Loading...


SPECIAL REPORT: इथे मिळत आहे फक्त 10 रुपयांत साडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricketer
First Published: Jun 7, 2019 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...