फटाकेबंदीवरुन सेनेतच फुटले 'फटाके'; राऊत म्हणतात, फटाकेबंदी नकोच !

फटाकेबंदीवरुन सेनेतच फुटले 'फटाके'; राऊत म्हणतात, फटाकेबंदी नकोच !

फटाक्यांवर बंदी हा प्रदूषण रोखण्याचा उपाय नाही. गंगा प्रदूषण फटाक्यांमुळे झाले नाही असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फटाकेबंदीला विरोध दर्शवलाय.

  • Share this:

10 आॅक्टोबर : फटाक्यांवर बंदी हा प्रदूषण रोखण्याचा उपाय नाही. गंगा प्रदूषण फटाक्यांमुळे झाले नाही. हजारो लोकांना रोजगार देणारा हा उद्योग आहे असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फटाकेबंदीला विरोध दर्शवलाय. तर दुसरीकडे सेनेचे मंत्री रामदास कदम यांनी फटाकेबंदीसाठी तयारी दर्शवली आहे.

दिल्ली हायकोर्टाने दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी आणली आहे. दिल्लीत फटाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातही फटाकेबंदीचं सुतोवाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलंय. पण, दुसरीकडे आता सेनेतूनच याला विरोध होतोय. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी फटाकेबंदीला कडाडून विरोध केलाय.

असंख्य मराठी मुलं  फटाक्यांचे स्टाॅलl लावून उदरनिर्वाह करीत आहेत. शिवसेना शाखांनी त्यांना जागा उपलब्ध करुन दिल्या. त्यांच्या पोटावर का मारता असा सवालच राऊतांनी उपस्थितीत केलाय.

जर तुम्हाला रोजगार देता येत नसेल तर आहे तो रोजगार काढून घेण्यात कसला पुरूषार्थ आहे ? 199 देशात फटाके फुटत आहेत. मग आपणच गरीबांच्या चुली का विझवत आहोत असंही राऊत म्हणाले.

फटाक्यांवर बंदी हा प्रदुषण रोखण्याचा उपाय नाही. गंगा प्रदुषण फटाक्यांमुळे झाले नाही असं म्हणत त्यांनी भाजपला टोलाही लगावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2017 06:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading