गाय आहे तर भविष्य आहे,नाहीतर काही नाही -मुख्यमंत्री

ज्या गावांमध्ये गायींची संख्या घटली. ज्या ठिकाणी शेतीचे उत्पादन कमी झालं, त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या वाढली असं मतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2017 04:45 PM IST

गाय आहे तर भविष्य आहे,नाहीतर काही नाही -मुख्यमंत्री

 

02 जुलै : 'गाय आहे तर भविष्य आहे, गाय नाही तर काही नाही'...हे उद्गार कुणा गोरक्षकाचे नाहीत तर ते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे..

मुंबईत जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची मेगा बिझनेस कान्फरन्स आयोजित करण्यात आलीय. या कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय. ज्या गावांमध्ये गायींची संख्या घटली. ज्या ठिकाणी शेतीचे उत्पादन कमी झालं, त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या वाढली असं मतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

तसंच गोरक्षा हा धार्मिक विषय नसून ज्या राज्यांमध्ये गायींची संख्या कमी झाली त्या राज्यांमध्ये जमिनी मोठ्या प्रमाणावर नापीक झाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यासोबतच महाराष्ट्रातील पाणी वाचवा मोहिमेला जैन समाजाने मोठी मदत केल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 04:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...