Home /News /mumbai /

धक्कादायक: राज्याला हादरे सुरुच, आज 3493 नवे कोरोनाग्रस्त; संख्या गेली 1 लाखांच्या वर

धक्कादायक: राज्याला हादरे सुरुच, आज 3493 नवे कोरोनाग्रस्त; संख्या गेली 1 लाखांच्या वर

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 127 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 3717वर गेली आहे. आजही मुंबईत सगळ्यात जास्त 90 जणांचा मृत्यू झाला.

    मुंबई 12 जून: राज्याला कोरोना व्हायरसचे हादरे सुरुच आहेत. आजही राज्यात 3493 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा 1 लाख 1 हजार 141 वर गेला आहे. तर राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 127 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या  3717वर गेली आहे. आजही मुंबईत सगळ्यात जास्त  90 जणांचा मृत्यू झाला.  दिवसभरात 1718 रुग्ण बरे झाले. तर राज्यात एकूण 47796 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 47.3 एवढं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेले काही दिवस राज्यात 3 हजारांच्या आसपास रुग्ण सापडत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये ही वाढ अशीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता पावसाळ्याची सुरूवात होणार असल्याने पुन्हा इतर साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. दरम्यान,  जुलै आणि ऑगस्टमध्ये हा कोरोना रुग्णांचा संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हाच धोका ओळखून मुंबई आणि दिल्लीतल्या बड्या सोसायट्यांनी आता पुढाकार घेत आपल्याच परिसरात आरोग्य सुविधा उभ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या पर्ल या बड्या सोसाटीमध्ये तब्बल 650 फ्लॅल्ट्स आहेत. तिथे 3 हजारांच्या आसपास लोक राहतात. त्यामुळे भविष्यातला धोका ओळखून या सोसायटीने आपल्याच परिसरात Quarantine Unit आणि ICU Unit उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सोसाटीचा क्लब हाऊस आणि रिकामे फ्लॅट्स यासाठी वापरण्यात येणार आहेत. कॅन्सरग्रस्त रम्याला वाचविण्यासाठी मराठी IPS अधिकाऱ्याची धडपड, पण... त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सोसायटीचेच सदस्य असलेले डॉ. निलेश शाह यांनी दिली. भविष्यात पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार असल्याने जागा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोसायटीनेच हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यासाठी पालिकेचीही परवानगी घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या देशातील सात राज्यात दहा हजाराहून अधिक नवी प्रकरण पुढे आलेले आहेत. यासह, देशातील सर्वाधिक संक्रमित राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश  पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. हरियाणामध्ये अवघ्या चार दिवसांत 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हरियाणामध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनाचं औषध मिळालं! पतंजलीने हजारो पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केल्याचा दावा गेल्या 7 जूनपर्यंत कोरोनामधून राज्यात केवळ 24 जणांचा मृत्यू झाला होता पण 11  जून रोजी हा आकडा 52 झाला. उत्तर प्रदेशामध्ये  दोन दिवसांत विक्रमी मृत्यूची नोंद झाली आहे.  उत्तर प्रदेशामध्ये 31  मेपर्यंत 201 लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु, गुरुवारपर्यंत 321  लोकांचा मृत्यू झाला होता. संकलन - अजय कौटिकवार
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या