बापरे! Unlock नंतर महाराष्ट्राची चिंता वाढली, कोरोना रुग्णांची संख्या गेली 90787वर   

बापरे! Unlock नंतर महाराष्ट्राची चिंता वाढली, कोरोना रुग्णांची संख्या गेली 90787वर   

राज्यातल्या एकूण रुग्णांचा संख्या 90 787 झाली आहे. गेले काही दिवस राज्यात दररोज अडीच ते तीन हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत.

  • Share this:

मुंबई 9 जून:  अनलॉक नंतर वर्दळ वाढल्याने आता महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. आजही राज्यात दोन हजारांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 2259 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 90 787  झाली आहे. गेली काही दिवस राज्यात दररोज अडीच ते तीन हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातला आकडा 1 लाखांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात आज 120 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 3289 एवढी झाली आहे.

तर पुण्यात लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाचा व्हायरस आता ग्रीनझोनमधील झोपडपट्ट्यांमधून मोठ्या झपाट्याने पसरत असल्याचं आढळून आलं आहे. खासकरून सिंहगड रोडवरील पाणमळा आणि जनता वसाहतीमध्ये तर कोरोना रूग्णांची संख्या साडेतीनशेच्यावर पोहोचलीय त्यामुळे पालिकेनं हा परिसर पत्रे ठोकून सील करून टाकला आहे. गेल्या काही दिवसांपासून मिळत असलेली सुट आणि अनलॉक नंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून संख्या वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या भागातले रहिवासी कॅनॉलच्या पाईपवरून धोकादायक पद्धतीने येजा करत असल्याने अपघाताचाही धोका वाढला आहे. पुणे शहरात रुग्णांचा संख्या वाढत असतानाच हे नवे हॉटस्पॉट तयार होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

पुण्यात राजकारण तापलं! भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केला वादग्रस्त प्रस्ताव

त्याचबरोबर आता बोपोडी नवा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून पुढे येताना दिसतोय कारण गेल्या चारच दिवसात तिथं तब्बल 94 पेशंट्स आढळून आले आहेत.

देशातल्या रुग्णांच्या संख्येत वाढ

देशभरात अनलॉक 1.0 अंतर्गत सोमवारपासून मॉल, हॉटेल आणि धार्मिक स्थळं खुली करण्यात आली. देशात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली असली तरी, कोरोनाबाधितांच्या संख्येत मात्र वाढ होतच आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 9987 नवीन रुग्ण आढळून आले तर 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 66 हजार 598 झाला आहे. मात्र असे असले तरी भारतासाठी ही चिंतेची बाब नाही आहे. याचं कारण आहे भारताचा रिकव्हरी रेट.

घाबरू नका! देशातील सर्वात वयोवृद्धानेही 45 दिवसांच्या लढाईनंतर कोरोनाला हरवलं

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात 1 लाख 29 हजार 971 सक्रीय प्रकरणं आहेत. तर, 7466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 29 हजार 214 रुग्ण निरोगी झाले आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 48.46% आहे. त्यामुळं भारतासाठी ही चांगली बाब आहे.

First published: June 9, 2020, 8:03 PM IST

ताज्या बातम्या