Home /News /mumbai /

महाराष्ट्र पुन्हा हादरला, मुंबईत सर्वात जास्त 97 जणांचा मृत्यू तर राज्यात 24 तासांत 3254 नवे रुग्ण

महाराष्ट्र पुन्हा हादरला, मुंबईत सर्वात जास्त 97 जणांचा मृत्यू तर राज्यात 24 तासांत 3254 नवे रुग्ण

याशिवाय चढ्या दराने फेस शिल्ड आणि मास्कची खरेदी मुंबईत करण्यात आली असून विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाचं हे कंत्राटं दिल्याचाही भाजपने दावा केला आहे. यावेळी ई टेंडरला बगल दिली गेल्याचे भाजपने आपल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे.

याशिवाय चढ्या दराने फेस शिल्ड आणि मास्कची खरेदी मुंबईत करण्यात आली असून विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाचं हे कंत्राटं दिल्याचाही भाजपने दावा केला आहे. यावेळी ई टेंडरला बगल दिली गेल्याचे भाजपने आपल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे.

राज्यात रुग्णांची एकूण संख्या 94041 वर गेली आहे. मुंबईतील रुग्णांचा एकूण आकडा 52667 वर गेला आहे.

मुंबई 10 जून: कोरोना रुग्णांच्या संख्येने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. राज्यात आज तब्बल 3254 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत आत्तापर्यंतचे सर्वात जास्त मृत्यू झालेत. मुंबईत आज तब्बल 97 जणांचा कोरोनामुळे प्राण गेला. तर राज्यात आज  149 जणांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 94041 वर गेली आहे. तर 1879 जणांचा डिस्चार्ज मिळालाय. राज्यात अॅक्टिव्ह केसेस 46074 आहे. मुंबईत आजची वाढ 1567 एवढी झाली आहे. तर  मुंबईतील रुग्णांचा एकूण आकडा  52667 वर गेला आहे. राज्यात कोरोनामुळे एकूण 3438 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास अडीच महिन्यांनंतर मुंबई आणि राज्यातले व्यवहार पुन्हा सुरळीत करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त गर्दी मुंबईत होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. लोक अनावश्यक घराबाहेर पडत राहिले, गर्दी करत राहिले तर लॉकडाऊनमध्ये दिलेली सुट परत घ्यावी लागले. म्हणजेच पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी आज दिलेत. 8 जून पासून जवळपास सर्वच व्यवहारांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गेली दोन दिवस मुंबईत पुन्हा एकदा ट्राफिक जाम अनुभवायला मिळालं. वाहनांची प्रचंड गर्दी झाली. लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले. सोशल डिस्टन्सिंगचं पालनही होत नसल्याने सरकारची चिंता वाढली आहे. 'राज्यपालांना ऑक्सफर्डपेक्षा जास्त ज्ञान असेल' शरद पवारांचा सणसणीत टोला त्यात सगळ्यात जास्त चिंता आहे ती मुंबईची. त्यामुळे सरकार त्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत कोरोना विरुद्धच्या लढाईत यश मिळत असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी चार गोष्टी चांगल्या असून ती आकडेवारी बघितली तर दिलासादायक चित्र समोर येतं. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या हवाल्याने आदित्य ठाकरे यांनी काही गोष्टींची आकडेवारी देत परिस्थिती गंभीर असली तरी नियंत्रणात असल्याचं  सूचित केलं आहे. 1. मुंबईचा डबलिंग रेट 5 दिवस. (राष्ट्रीय सरासरी 16 दिवस) 2. मृत्यू दर कमी होऊन 3% झाला आहे (जवळपास राष्ट्रीय सरासरीइतके) 3. डिस्चार्ज रेट: 44% 4. धारावीतील डबलिंग रेट: 42 दिवस EDचा दणका, नीरव मोदी आणि चोकसीचा 1,350 कोटींचा खजिना हाँगकाँगहून आणला भारतात मुख्यमंत्री (CM uddhav thackeray) उद्धव ठाकरे यांनी Unlock 1.0 चा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा उपनगरीय लोकल वाहतूक सुरू करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडे उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांदा ही मागणी केली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करावी असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. संपादन - अजय कौटिकवार
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Coronavirus, Mumbai

पुढील बातम्या