मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Vaccine Shortage: लसींचा मोठा तुटवडा; मुंबई पाठोपाठ ठाणे-पुण्यात लसीकरण ठप्प

Vaccine Shortage: लसींचा मोठा तुटवडा; मुंबई पाठोपाठ ठाणे-पुण्यात लसीकरण ठप्प

राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असताना आता अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत आहे.

राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असताना आता अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत आहे.

राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असताना आता अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत आहे.

ठाणे, 28 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Covid19 vaccination) मोहिमेने वेग घेतला आहे. लस घेण्यासाठी नागरिक सुद्धा पुढाकार घेत आहेत. मात्र, या परिस्थितीत आता कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा (Vaccine shortage) जाणवण्यास सुरुवात झाल्याचं अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. मुंबई (Mumbai) पाठोपाठ आता ठाणे (Thane) आणि पुण्यातही (Pune) कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत आहे. लसींच्या अभावी लसीकरण ठप्प झाले आहे.

ठाण्यात कोव्हॅक्सिन संपली, कोविशिल्डचा एकही डोस नाही

मुंबई पाठोपाठ ठाण्यातील पालिकेच्या केंद्रावर लसीकरण ठप्प होणार असल्याचं दिसत आहे. ठाणे शहरात उद्या पालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार नाहीये. कारण आज उपलब्ध असलेली covaxin संपली आहे तर कॉविशिल्ड लसीचा एकही डोस आज उपलब्ध नव्हता. आतापर्यंत पहिला आणि दुसरा डोस मिळून 2,86,388 डोस देण्यात आले आहेत.

वाचा: महाराष्ट्रात 1 मे पासून 18+ नागरिकांना लस मिळणार नाही

पुण्यातही लसीचा तुटवडा

पुणे शहरात आज लशीकरण ठप्प झाले आहे तर उद्या ग्रामीण भागातही लशीकरण होणार नाहीये. मावळ मुळशी वेल्हा भोर 4 तालुक्यातील लशींचा साठा संपला आहे. जिल्हा पारिषदे तर्फे मुंबईत आणि पुण्यात सीरम संस्थेकडे वाहने गेली मात्र लशींचा साठा नसल्याने उद्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरण होणार नाहीये.

पुण्यात लशींच्या तुटवड्यामुळे बहुतांश लशीकरण केंद्रे बंद होती. शासनाकडून आलेल्या 38 हजार लशींपैकी तुरळक साठा शिल्लक असल्याने जवळपास शहरात लशीकरण ठप्प होतं त्यातच 1मे पासून 18 वर्षे वयाच्या वरील नागरिकांना लस दिली जाणार आहे त्या करता आजपासून नोंदणी सुरू व्हायची होती तीही सुरू झाली नाही सर्व्हर hang होत असल्याच्या तक्रारी आल्या. पुण्यात जवळपास 2 लाख जेष्ठ नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे.

शहरात पालिकेची आणि खाजगी अशी मिळून 193 लशीकरण केंद्रे आहेत. 1 मे पासून मिळणारा साठा हा सर्वस्वी पालिका रुग्णालया करता असेल खाजगी हॉस्पिटलकडे पालिकेच्या हिश्श्यातील लसी जाणार नाहीत मात्र पुरेशा लसी नसतील तर लसीकरण होणार कसं हा सवाल आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Maharashtra, Mumbai, Pune, Vaccination