मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बापरे! कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राने चीनला टाकले मागे, ओलांडला 86000चा टप्पा

बापरे! कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राने चीनला टाकले मागे, ओलांडला 86000चा टप्पा

राज्यात 120 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. गेले काही दिवस दररोज शंभर पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत असल्याने चिंता वाढली आहे.

राज्यात 120 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. गेले काही दिवस दररोज शंभर पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत असल्याने चिंता वाढली आहे.

राज्यात 120 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. गेले काही दिवस दररोज शंभर पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत असल्याने चिंता वाढली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

मुंबई 7 जून:  राज्यात आज 3007 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 85975 अशी झाली आहे. आज नवीन 1924 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 39314 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 43591 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातली रुग्णसंख्या 85 हजारांच्या वर गेल्याने महाराष्ट्राने चीनलाही मागे टाकले आहे. तर देश कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात 5 व्या क्रमांकावर असून स्पेनलाही भारताने मागे टाकले आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये संख्या अशीच राहिल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या राज्यात 43591 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात ४७ शासकीय आणि ३८ खाजगी अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ३७ हजार १२४ नमुन्यांपैकी ८२ हजार ९६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७४१ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ०९८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.

दरम्यान, रुग्णांना विनाकारण भीती दाखवून हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करुन घेतले आणि अव्वाच्या सव्वा बील आकारले म्हणून ठाणे महानगर पालिकेने ठाण्यातील दोन खासगी हॉस्पिटलला मोठा दणका दिला आहे. या खासगी हॉस्पिटलला पालिकेकडून 16 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

जगभरात कोरोनाने घेतला लाखोंचा बळी; या 3 देशांमध्ये माजलाय हाहा:कार

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांककडून हॉस्पिटल विरोधात तक्रारी येत होत्या. त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. कोणताही आजार नसताना ठाण्यातील दोन हॉस्पिटल्सनी 13 ठाणेकरांना दाखल करुन घेतले होते आणि त्यांच्यावर 7 दिवस उपचार करुन त्यांच्याकडून लाखोंची बीले आकारली होती. याबाबत ठाणे महानगर पालिकेकडे तक्रार आल्यावर ठाणे महानगर पालिकेने चौकशी करुन या दोन हाॉस्पिटलवर कारवाई केली आहे.

हे वाचा -

प्रेग्नन्सीत महिलेला झाला कोरोना; अँटिबॉडीजसह जन्माला आलं बाळ

राजकारण पेटलं! भाजपच्या माजी खासदारांचा BMCवर गंभीर आरोप, केली पोलिसांत तक्रार

First published:

Tags: Coronavirus