मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सलग चौथ्या दिवशीही मुंबईतील लसीकरण केंद्र राहणार बंद, केवळ 'या' नागरिकांना मिळणार लस

सलग चौथ्या दिवशीही मुंबईतील लसीकरण केंद्र राहणार बंद, केवळ 'या' नागरिकांना मिळणार लस

Covid vaccination in Mumbai: मुंबईकरांना आता चौथ्या दिवशीही कोरोना प्रतिबंधक लस मिळणार नाहीये.

Covid vaccination in Mumbai: मुंबईकरांना आता चौथ्या दिवशीही कोरोना प्रतिबंधक लस मिळणार नाहीये.

Covid vaccination in Mumbai: मुंबईकरांना आता चौथ्या दिवशीही कोरोना प्रतिबंधक लस मिळणार नाहीये.

मुंबई, 2 मे: गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेले मुंबईतील लसीकरण (vaccination in Mumbai) आता उद्या (3 मे 2021) म्हणजेच सलग चौथ्या दिवशीही बंद राहणार आहे. मुंबई महानगरपालिके (BMC)ने या संदर्भात माहिती दिली आहे. 45 वर्षांवरील नागरिकांना उद्या कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेता येणार नाहीये. लसींचा तुटवडा असल्याने उद्या लसीकरण होऊ शकणार नाहीये (there will be no vaccination for Mumbaikars). मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र सलग चौथ्या दिवशी बंद राहणार आहेत. ज्या लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यात येते असे केंद्र लशींच्या अभावी बंद राहणार आहेत. वाचा : कोरोनाग्रस्त वडिलांची ऑक्सिजन पातळी खालावली; ICU मधील मुलाने बापासाठी बेड केला रिकामी या नागरिकांना मिळणार उद्या लस 45 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लस मिळणार नाहीये तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी मुंबईतील केवळ 5 लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. तसेच ज्या नागरिकांनी आपली नोंदणी केली आहे आणि ज्यांना लस घेण्याच्या संदर्भात मेसेज आला आहे त्यांनाच लस दिली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी उद्या लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना एकूण 5 केंद्रांवर लस देण्यात येणार आहे त्यामध्ये सायन, राजावाडी रुग्णालय, बीकेसी लसीकरण केंद्र, कूपर रुग्णालय, सेव्ह हिल्स रुग्णालय येथील केंद्राचा समावेश आहे.
First published:

Tags: BMC, Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या