COVID: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या गेली 16 लाखांच्या जवळ

COVID: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या गेली 16 लाखांच्या जवळ

राज्यात कोरोनाचा आलेख घसरतो आहे. ही घसरण गेल्या महिनाभरापासून कायम आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढलेली आहे.

  • Share this:

मुंबई 11 नोव्हेंबर: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) आलेख घसरतो आहे. ही घसरण गेल्या महिनाभरापासून कायम आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढलेली आहे. बुधवारी (11 नोव्हेंबर) 9,164 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाखांच्या जवळ म्हणजे 15,97,255 एवढी झाली आहे. तर दिवसभरात 4,907 नवे रुग्ण आढळून आलेत. 24 तासांमध्ये 125 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 17,31,833 एवढी झालीय. तर आत्तापर्यंत 45,560 जणांचा मृत्यू झाला. राज्यात उपचाराधिन असलेल्या रुग्णांची संख्या ही घटून आता 88,070 एवढी झाली आहे.

देशात आतापर्यंत कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात होती. मात्र आता महाराष्ट्रासह छोट्या राज्यांमध्ये कोरोना हातपाय पसरू लागला आहे. छोट्या राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढू लागली आहेत. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे.

महाराष्ट्रासह उत्तराखंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि गोव्यामध्ये कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

गेल्या महिनाभरात देशातील एकूण मृत्यूंपैकी 40% मृत्यूची नोंद फक्त गोव्यात झाली आहे. मिझोराममध्ये कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण वाढत आहेत. 70 प्रकरणं फक्त ऐझॉलमध्येच आहेत. त्रिपुरा आणि मेघालयातही ज्या वयोगटातील लोकांचा कोरोनाव्हायरसपासून बचाव करता येऊ शकतो, अशा वयोगटातील लोकांचा सर्वाधिक मृत्यू होता आहे.

भारताची कोरोना लस कोवॅक्सिनचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी नोंदणी होते आहे. अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंनीही तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 11, 2020, 9:06 PM IST

ताज्या बातम्या