मुंबई 10 ऑक्टोबर: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र मृत्यूचा आकडा कमी होतांना दिसत नाही. शनिवारी राज्यात 308 जणांचा मृत्यू झाला त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही 40 हजार 40 एवढी झाली आहे. दिवसभरात 11,416 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 15 लाख 17 हजार 437 एवढी झाली आहे. तर तब्बल 26,440 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बरे झालेले रुग्णांची संख्या ही 12 लाख 55 हजार 779 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 21 हजार 156 एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सध्या 22, 68, 057 होम क्वारांटाईन आहेत तर 24, 994 संस्थात्मक क्वारटाईनमध्ये आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 82.76 टक्के झाला आहे.
मुंबईत 24 तासांमध्ये 2203 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 48 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या रुग्णांची एकूण संख्या ही 2,27,276 एवढी झाली आहे. तर 9 हजार 391 जणांचा मृत्यू झाला.
कोरोना टेस्टिंगबाबत भाजपच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप, राज्यात खळबळ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आरोग्य पथ सध्या पुण्यात आलं आहे. पुण्यातील जम्बो सेंटरसह कोरोनाबाधित क्षेत्राची पाहणी या आरोग्य पथकानं केली. कोरोनाची सद्यस्थिती, त्याचे परिणाम आणि वाढीची चिन्हे या अनुषंगाने महापालिकेला काही सूचनाही या पथकाकडून करण्यात आल्या आहेत.
‘संघ’ मुस्लिमांना दुय्यम नागरिक समजतो, ओवेसींचा भागवतांवर निशाणा
पुढील दीड महिना म्हणजेच नोव्हेंबर अखेरपर्यंत रुग्णसंख्या आणखी कमी होईल, असे पथकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं आहे. परंतु, डिसेंबर आणि जानेवारीत मात्र कोरोनाचा संसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटीलेटर बेड्स सज्ज ठेवण्याच्या सूचना आरोग्य पथकानं दिल्या आहेत.