मुंबई 04 ऑगस्ट: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा उच्चांक झाला आहे. पहिल्यांदाच तब्बल 12,323 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आजपर्यंत राज्यात एकूण दोन लाख 99 हजार 356 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.37 टक्के एवढे आहे. राज्यात आज 7760 नवीन रुग्ण सापडले. राज्यात आज तीनशे रुग्णांचा मृत्यू सध्या राज्यातील मृत्यूदर 3. 52 टक्के एवढा झाला आहे. तर रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 57 हजार 956 एवढी झाली आहे.
राज्यात नऊ लाख 44 हजार 442 व्यक्ती घरात विलगीकरण आत आहेत तर 43 हजार 906 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण यात आहेत.
सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडले. गेल्या 24 तासांत 52 हजार 050 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 803 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 55 हजार 746 झाली आहे. यात 5 लाख 86 हजार 298 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 12 लाख 30 हजारहून अधिक रुग्ण निरोगी झाले आहे.
इंडियन काउन्सिल ऑफ रिसर्च (ICMR) नुसार देशात आतापर्यंत 2 कोटी 8 लाख 64 हजार 750 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल 6 लाख 61 हजार 182 लोकांची चाचणी करण्यात आली.
कोरोना संक्रमितांच्या संख्येत भारत, अमेरिका आणि ब्राझील जगातील तीन सर्व प्रभावित देश आहे. मात्र यात भारतातील परिस्थिती चांगली आहे. भारताचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. भारतापेक्षा अधिक प्रकरणं अमेरिका (4,862,174), ब्राझीलमध्ये (2,751,665) आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जायला परवानगी मिळणार किंवा नाही याबाबत गेले अनेक दिवस कमालीची उत्सुकता होती. आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही नियम पाळावे लागणार असून त्याचं पालन करूनच जावं लागणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
खासगी वाहनाने जाणाऱ्यांना मात्र ई पास लागणार आहे.
GOOD NEWS! रशियात कोरोनाची लस तयार; पुढील महिन्यापासून उत्पादन होणार सुरू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता क्वारंटाइनचा कालावधी हा 10 दिवसांचा करण्यात आला आहे. तर सात हजार गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. बुकिंग प्रमाणे गाड्या सोडल्या जाणार आहेत. मंगळवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळ 6 वाजल्यापासून तिकीट बुकिंग सुरू झालं आहे.
अरे देवा! कोरोना व्हायरसला मारण्यासाठी पठ्ठ्याने वॉशिंग मशिनमध्येच धुतल्या नोटा
एस टी मध्ये 22 लोकांना प्रवास करता येईल. मुंबईहून थेट गावात प्रवासी जातील मध्ये कुठेही थांबणार नाहीत. जेवण स्वत:चं जेवण घेऊन प्रवास करायचा आहे. जेवणासाठी एस टी थांबणार नाही. फक्तं 2 ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी बस थांबणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.