Home /News /mumbai /

महाराष्ट्र पुन्हा हादरला: आत्तापर्यंतची 9518 रुग्णांची सर्वात जास्त वाढ, मृत्यू संख्या 12 हजारांच्या जवळ

महाराष्ट्र पुन्हा हादरला: आत्तापर्यंतची 9518 रुग्णांची सर्वात जास्त वाढ, मृत्यू संख्या 12 हजारांच्या जवळ

आज मुंबईत 1038 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईतल्याच एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 388 एवढी झाली आहे.

मुंबई 19 जुलै: राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झालीय. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 9518 रुग्ण आढळून आले आहेत. तर 258 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3,10,455 एवढी झालीय. तर मृत्यूचा आकडा 12 हजारांच्या जवळ गेला आहे. आज 3906 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात 1,28,730 Active रुग्ण आहेत. तर राज्यातल्या एकूण मृत्यूची संख्या ही 11 हजार 854 वर गेली आहे. आज मुंबईत 1038 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईतल्याच एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 388 एवढी झाली आहे. आज मुंबईत 64 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची मृत्यूसंख्या ही 5714 वर गेली आहे. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच कोरोनावरच्या लशींच्या संशोधनातही प्रगती झाली आहे. जगभर धुमाकूळ घालणाऱ्या COVID-19वर लस शोधण्यासाठी सर्व जग प्रयत्न करत आहे. सर्व देशांमधले तज्ज्ञ डॉक्टर्स, औषध निर्माण क्षेत्रातल्या कंपन्या अहोरात्र प्रयत्न करत  आहेत. या प्रयत्नांमध्ये भारतही आघाडीवर असून यात 7 कंपन्यांनी (Indian pharma companies) मोठा पल्ला गाठला आहे. यातल्या बायोटेकच्या लशीची मानवी चाचणीसुद्धा सुरु झाली आहे. तर इतर काही कंपन्याही क्लिनिकल चाचण्यांसाठी तयार आहेत. यात यश मिळालं तर 130 कोटींच्या आपल्या देशाला आणि सर्व जगालाच त्याचा फायदा होणार आहे. कोरोनाची दहशत वाढली! रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्यानं पाचव्या मजल्यावरून मारली उडी कोरोना व्हायरसने जगभरातल्या 1.4 कोटी लोकांना बाधित केलं आहे. दररोज त्याचं संक्रमण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. भारतीय कंपन्यांमध्ये भारत बायोटेक (Bharat Biotech), सीरम इंस्टिट्यूट (Serum Institute), झायडस कॅडिला (Zydus Cadila), पॅनासिया बायोटेक (Panacea Biotec), इंडियन इम्युनॉलॉजिकल्स (Indian Immunologicals), मायनवॅक्स (Mynvax) आणि बॉयलॉजिकल ई (Biological E)  या दिग्गज औषध निर्माण कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान देशातील कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांनी आज सर्व रेकॉर्ड मोडले. देशात पहिल्यांदाच 24 तासांत तब्बल 38 हजार 903 नवे रुग्ण सापडले. यासह आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 10 लाख 77 हजार 618 झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 543 रुग्णांचा मृत्यू झाला. निवडणुकीत प्रचारासाठी भाजप नेत्यांची स्वारी घोड्यावर, कोरोनामुळे फुटला घाम आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात 3 लाख 73 हजार 379 सक्रिय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 26 हजार 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर, 6 लाख 77 हजार 422 रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या 10.86 टक्के आहे. तर, रिकव्हरी रेट हा 65.24% झाला आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या