मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

 बापरे! राज्यात आजही विक्रमी 8308 कोरोना रुग्णांची भर, एकूण संख्या गेली 3 लाखांच्या जवळ

 बापरे! राज्यात आजही विक्रमी 8308 कोरोना रुग्णांची भर, एकूण संख्या गेली 3 लाखांच्या जवळ

मुंबईत आज 1214 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईतली एकूण संख्या ही 99 हजार 164 एवढी झालीय. तर शहरात आज 62 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत आज 1214 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईतली एकूण संख्या ही 99 हजार 164 एवढी झालीय. तर शहरात आज 62 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत आज 1214 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईतली एकूण संख्या ही 99 हजार 164 एवढी झालीय. तर शहरात आज 62 जणांचा मृत्यू झाला.

मुंबई 17 जुलै:  राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 8308 कोरोना रुग्णांची भर पडली. तर राज्यात आज 285 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 92 हजार 589 एवढी झाली आहे.  राज्यात 1, 20,480 Active रुग्ण आहेत. आज 2217 जणांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 60 हजार 357 एवढी झाली आहे. तर मुंबईत आज 1214 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईतली एकूण संख्या ही 99 हजार 164 एवढी झालीय. तर शहरात आज 62 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या एकूण मृतांची संख्या 5585 एवढी झाली आहे. तर मुंबईत 23948 Active रुग्ण आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील 2-3 दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील, त्यानंतर शहरात पुन्हा लॉकडाऊन करायचा की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. नाशिकमध्ये कोरोनाचा कहर! आता Parle-G बिस्किट उत्पादक कंपनीत कोरोनाचा शिरकाव देशात कोरोनाचा वेग वेगाने वाढत आहे. संक्रमितांचा आकडा आता रोज 30 हजारांच्या घरात जात आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली आहे. आज 34 हजार 956 नव्या रुग्णांची नोंद झाली. याआधी 16 जुलै रोजी 32 हजार 607 रुग्ण सापडले होते. गेल्या 24 तासांत 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक 22 हजार 834 रुग्ण निरोगी झाले आहेत. एकाच दिवसात निरोगी झालेल्या रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 63.3% झाला आहे. धक्कादायक: मुंबईत कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण महिलेवर अतिप्रसंग आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात 3 लाख 42 हजार 473 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 25 हजार 602 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर, आतापर्यंत 6 लाख 35 हजार 756 लोकं निरोगी झाले आहेत.
First published:

पुढील बातम्या