COVID-19: महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांची परिस्थिती गंभीर, सरकार तयार करणार Action Plan

COVID-19: महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांची परिस्थिती गंभीर, सरकार तयार करणार Action Plan

  • Share this:

मुंबई 23 सप्टेंबर: देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात 20 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर असून तिथे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आता खास योजना तयार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 7 राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना स्थितीवर चर्चा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहभागी झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना आपापल्या राज्यातली स्थिती सांगितली.

यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है असं कौतुक केलं. कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना करत त्यांनी चिंताही व्यक्त केली.

पंतप्रधान म्हणाले, देशात 700 जिल्हे आहेत आणि त्यात 7 राज्यांमधल्या फक्त 60 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातले 20 जिल्हे आहेत ही चिंतेची बाब आहे.

या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी, तरीही 7 दिवसांचा 'जनता कर्फ्यू'

या जिल्ह्यांमधला कोरोनाचा प्रसार कसा आटोक्यात आणता येतील याची काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्य सरकार करीत असलेल्या काही महत्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्यात लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्राव्य घेतले जातात. रॅपिड एन्टीजेन चाचणी  निगेटिव्ह आली तर दुसरा घेतलेला द्राव्य आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठविला जातो, औषधांची उपलब्धता ठेवली आहे,  दररोज दीड लाखपर्यंत चाचण्या वाढवीत आहोत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 23, 2020, 10:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या