COVID-19: राज्यात नवे रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येतली घट कायम

COVID-19: राज्यात नवे रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येतली घट कायम

रविवारी 11 हजार 204 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात आजपर्यंत एकूण 13 लाख 69 हजार 810 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) हे 85.86 एवढे झाले आहे.

  • Share this:

मुंबई 18 ऑक्टोबर:  गेल्या काही महिन्यापासून राज्यात कोरोना रुग्णांचा चढता आलेख सध्या घसरणीला लागला आहे. सलग गेल्याकाही दिवसांपासून ही घसरण होत आहे. रविवारीही हीच घट दिसून आली. दिवसभरात नवे रुग्ण आणि मृत्यूच्या संख्यातही घट झाल्याचं दिसून आलं आहे. रविवारी 11 हजार 204 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत तर  राज्यात आजपर्यंत एकूण 13 लाख 69 हजार 810 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) हे 85.86 एवढे झाले आहे. दिवसभरात 9 हजार 60 नव्या रुग्णांची भर पडली. तर 150 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर 2.64 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 81 लाख 39 हजार 466 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 15 लाख 95 हजार 381 म्हणजेच 19.6 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 24 लाख 12 हजार 921 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 23 हजार 384 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, देशातल्या काही भागात कोरोना व्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालं असल्याची कबुली केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. रविवारी आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियावर संवाद साधताना त्यांनी हे सांगितलं. केंद्र सरकारने आतापर्यंत कम्युनिटी ट्रान्समिशनची बाब फेटाळली होती. मात्र आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच त्याबाबत भाष्य केलं आहे.

आरोग्यमंत्री म्हणाले, पश्चिम बंगालसहीत काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या भागात कम्युनिटी ट्रान्समिशन झालं असल्याचं दिसतं आहे. मात्र हे मोठ्या प्रमाणावर नसून फक्त काही जिल्ह्यांपूरतच मर्यादीत आहे. सरकार त्यावर उपयायोजना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दाट लोकसंख्या असलेल्या वस्तिमध्ये याचा प्रसार झाल्याचं आढळलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली. जानेवारी महिन्यात पहिल्यांदा देशात कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर अनेकदा याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र प्रत्येक वेळी ही बाब नाकारण्यात आली होती.

आता खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीच ते मान्य केलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 18, 2020, 8:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading