COVID-19: राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 15 लाखांच्या जवळ, पण सावध राहण्याचा इशारा

COVID-19: राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 15 लाखांच्या जवळ, पण सावध राहण्याचा इशारा

Coronavirus Graph in Maharashtra: राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.39 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 115 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.

  • Share this:

मुंबई 27 ऑक्टोबर: राज्यात कोरोनाचा  घसरणीला लागलेला आलेख (Coronavirus Graph in Maharashtra) कायम आहे. सलग गेल्या काही दिवसांपासून ही घसरण सुरू असून त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मंगळवारी राज्यात 7,836 रुग्ण कोरोनामुक्त झाले (Discharge Patient). तर 5,363 नव्या रुग्णांची भर पडली. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 15 लाखांच्या जवळ म्हणजे 14,78,496 एवढी झाली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)  89.39 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 115 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद  झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के एवढा झाला आहे. मुंबई आणि पुणे या मोठ्या शहरांमध्येही ही रुग्णसंख्या घसरणीला लागलेली आहे.

महाराष्ट्राप्रमाणे देशतही रुग्णांची संख्या घसरणीला लागली असून त्यामुळे बेफिकीर न होता सावध राहण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे.

सलग 5 आठवड्यांपासून देशातला कोरोनाचा (Coronavirus) आलेख घसरणीला लागला आहे. गेल्या 13 दिवसांमध्ये तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने(Health Ministry) दिली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली आहे. हे सर्व दिवस हे नवरात्रातले होते. त्यामुळे या काळात संख्या घसरणीला लागणे ही दिलासादायक बाब मानली जाते.

BIG NEWS: Unlock 5.0ची मुदत 30 नोव्हेंपर्यंत वाढली, जाणून घ्या नवे नियम

देशाचा Recovery Rate हा 90.62वर गेला आहे. देशातल्या उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 78 टक्के रुग्ण हे 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

या राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तमिलनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ आणि तेलंगानाचा समावेश आहे. यात महाराष्ट्रात 21.52 टक्के, केरल 15, कर्नाटक 12.05, पश्चिम बंगाल 5.94 तमिलनाडू 4.68, आंध्र प्रदेश 4.60, उत्तर प्रदेश 4.26, दिल्ली 4.12, छत्तीसगढ 3.53  तेलंगाना 2.86 टक्के एवढ्या रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 58 टक्के मृत्यू हे 5 राज्यांमध्ये झाले आहेत. त्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगढ आणि कर्नाटकचा समावेश आहे. या आधी 1 लाख रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी 57 दिवस लागत होते आता 13 दिवसांमध्ये 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना लस मोफत! BJP चा चुनावी जुमला, काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या संतापल्या

23 ते 29 स्पटेंबरच्या दरम्यान रोज सरासरी 83,232 नवे रुग्ण सापडत होते. 21 ते 27 ऑक्टोबरच्या दरम्यान ही संख्या 49,909 हजारांवर गेली अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19चे 49.4 टक्के रुग्ण हे केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीतून आले आहेत. भारतातला कोविड-19 चा रिकव्हरी रेट सप्टेंबर महिन्यात 76.94  होता तो आता 90.62 टक्क्यांवर गेला आहे. भारतात कोविडचा मृत्यूदर हा 1 सप्टेंबरला 1.77 होता तो आता 1.50 टक्के एवढा झाला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 27, 2020, 8:26 PM IST

ताज्या बातम्या