COVID-19: राज्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही घसरली, मृत्यूचं प्रमाण 100 च्या खाली

COVID-19: राज्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही घसरली, मृत्यूचं प्रमाण 100 च्या खाली

राज्याचा मृत्यू दर हा 2.62 एवढा झाला आहे. तर राज्यात सध्या उपचार घेण्याऱ्या रुग्णांची संख्या 1 लाख 28 हजारापर्यंत खाली आली आहे.

  • Share this:

मुंबई 28 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात घसरणीला लागलेला कोरोना रुग्णांचा आलेख कायम आहे. बुधवारी राज्यात 8 हजार 430 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 14 लाख 86 हजारांवर गेली आहे. त्यामुळे राज्याचा Recovery Rate हा 89.53 एवढा झाला आहे. दिवसभरात 6 हजार 738 रुग्णांची भर पडली तर 91 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.62 एवढा झाला आहे. तर राज्यात सध्या उपचार घेण्याऱ्या रुग्णांची संख्या 1 लाख 28 हजारापर्यंत खाली आली आहे.

सलग 5 आठवड्यांपासून देशातला कोरोनाचा (Coronavirus in India) आलेख घसरणीला लागला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेटदेखील 90.62 वर गेला आहे. देशातील कोरोनाची आकडेवारी दिलासादायक असली तरी महाराष्ट्राचा (Maharashtra) धोका मात्र पुन्हा वाढला आहे. सणासुदींच्या काळात महाराष्ट्रात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, याबाबत केंद्र सरकारने सावध केलं आहे आणि कोरोनाशी लढण्याची रणनीती बदलण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी देशातील कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात 5 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा समावेश आहे.

देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी 48.57 प्रकरणं फक्त महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात आहेत.  24 तासांत कोव्हिड 19 मुळे मृत्यू झालेली 58 टक्के प्रकरणं महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगढ आणि कर्नाटकातील आहेत. या कालावधीतील कोरोनाची 49.4 टक्के नवीन प्रकरणं  केरळ (4,287), पश्चिम बंगाल (4,121), महाराष्ट्र (3,645), कर्नाटक (3,130) आणि दिल्लीतील (2,832) होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 28, 2020, 8:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading