COVID-19: राज्यात नव्या रुग्णांची निच्चांकी वाढ, मृत्यूची संख्याही शंभरच्या आत

COVID-19: राज्यात नव्या रुग्णांची निच्चांकी वाढ, मृत्यूची संख्याही शंभरच्या आत

राज्यातल्या कोरोना रुग्णांच एकूण संख्या ही 16 लाख 48 हजारांच्यावर गेलीय. तर 9 हजार 905 एवढे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

  • Share this:

मुंबई 26 ऑक्टोबर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून घसरणीला लागलेल्या रुग्णांची संख्या कायम आहे. सोमवारी दिवसभरात निच्चांकी नव्या रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात 3 हजार 645 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर बरे होण्याचा दर हा 89 टक्क्यांवर गेला आहे. दिवसभरात 84 जणांचा मृत्यू झाला.  राज्यात 1 लाख 34 रुग्णावर उपचार सुरू आहेत.

राज्यातल्या कोरोना रुग्णांच एकूण संख्या ही 16 लाख 48 हजारांच्यावर गेलीय. तर 9 हजार 905 एवढे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ही 14 लाख 70 हजारांच्यावर गेलीय.

मुंबईतही आज निच्चांकी वाढ नोंदवली गेली. दिवसभरात 800 नव्या रुग्णांची भर पडली. तर 37 जणांचा मृत्यू झाला.

पुण्यातही सोमवारी दिवसभरात गेल्या पाच महिन्यातील निच्चांकी कोरोना रूग्णवाढ नोंदविण्यात आली. दिवसभरात अवघे 147 रूग्ण आढळून आले आहेत.

क्रिटिकल रूग्णांची संख्याही 15 दिवसात हजारांवरून 639वर आली आहे. तर सध्या शहरात 6 हजार 500 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी (26 ऑक्टोबर) दिवसभरात 147 नव्या रुग्णांची भर पडली तर बरे झाल्यामुळे 410 जणांना घरी सोडण्यात आलं.

पुण्यात 32 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 13 रूग्ण पुण्याबाहेरचे आहेत. सध्या 639 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 356 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

‘गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं’, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला संताप

त्यामुळे पुण्यातल्या रुग्णांची एकूण रूग्णसंख्या ही 159845 एवढी झाली आहे. तर  4141 जणांचा मृत्यू झालाय.

देशातही आलेख घसरणीला

भारत गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून कोरोनाशी निकराची झुंज देत आहे. 22 मार्चपासून पहिल्यांदाच देशाचा मृत्यूदर निच्चांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

देशाचा सध्याचा मृत्यूदर हा 1.5 टक्के एवढा आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 500 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सोमवारी सकाळपर्यंत देशात 45,149 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 79,09,960 एवढी झाली आहे.

Oxford च्या कोरोना लशीचा कसा होतोय परिणाम; ट्रायलबाबत समोर आली नवी माहिती

तर देशातल्या कोरोना मृत्यूचा आकडा हा 1,19,014 एवढा झाला आहे. देशात सध्या 6,53,717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 59,105 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 71,37,229 झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा पहिला क्रमांक लागतो. देशात कोरोना रुग्णांची संख्या घसरणीला लागली असली तरी काळजी घेतली नाही तर दुसरी लाट येऊ शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 26, 2020, 8:59 PM IST

ताज्या बातम्या