COVID-19: सरकारी सेवेतल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी STच्या विशेष फेऱ्या सुरू होणार

COVID-19: सरकारी सेवेतल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी STच्या विशेष फेऱ्या सुरू होणार

'लोकल सेवा सुरू केल्यावर लोकांची गर्दी झाली आणि संसर्गामुळे कुणी दगावलं तर मनसे जबाबदारी घेणार आहे का?'

  • Share this:

मुंबई 18 सप्टेंबर: कोरोनाचं संकट (Corona Crisis ) असल्याने सध्या रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. मुंबई उपनगरात राहणाऱ्या लोकांचे तर अनेक तास फक्त बससाठीच्या रांगेतच जात आहेत. त्यात महिलांचे सर्वात जास्त हाल होत आहेत. आता सरकारी सेवेतल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एस.टी. महामंडळ विशेष फेऱ्या (ST Service ) सुरू करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांनी केली.

मुंबईत लोकल सेवा बंद असल्याने प्रवासासाठी प्रचंड हा अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यात सरकारने ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचं प्रमाण वाढवलं आहे. त्यामुळे व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढणार आहे. तो ताण कमी करण्यासाठी महिलांसाठी या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून ही सेवा सुरू होणार आहे.

परब पुढे म्हणाले, पूर्ण विचाराअंती आम्ही एसटी बस सेवा पुर्ण क्षमतेने सुरू केलीय. मास्क, सेनिटाईज करणे बंधनकारक केलंय. सुरक्षा घेऊनच एसटी प्रवास सुरू केला आहे. एस टी आधीच तोट्यात होती. त्यामुळे कोरोनाच्या परीस्थितीत आणखी तोट्यात गेली. त्यामुळे आता एसटी सरू केलीय. राज्य सरकारकडे अतीरिक्त निधी मागितला आहे. एस टी कर्मर्चार्यांचे पगार लवकरच होतील. वैदीकीय क्षेत्रातील लोकांशी बोलूनच आम्ही हा निर्णय घेतलांय.

आम्ही राज्य चालवताना लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य घेऊनच निर्णय घेतोय. त्यामुळे लोकल सेवा सुरू केली आणि त्यामुळे आणि पूर्वी प्रमाणे लोकांची गर्दी झाली दूर्दैवाने पुन्हा संसर्ग झाला कुणी दगावलं तर मनसे जबाबदारी घेणार आहे का...? त्यामुळे काळजी घेऊनच आम्ही लोकल सेवा सुरू करू असंही परब यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 18, 2020, 7:38 PM IST

ताज्या बातम्या