राज्यात उच्चांकी 10 हजार रुग्णांना डिस्चार्ज, मात्र मृत्यूची संख्या वाढल्याने चिंता

राज्यात उच्चांकी 10 हजार रुग्णांना डिस्चार्ज, मात्र मृत्यूची संख्या वाढल्याने चिंता

मुंबईत 1,059 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 45 जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:

मुंबई 1 ऑगस्ट: महाराष्ट्रात आज तब्बल 10 हजार कोरोना रुग्णांना 24 तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने 9,601 रुग्ण सापडले. तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली असून आज 322 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृत्यूची संख्या ही 15,316वर गेली असून एकूण रुग्ण 4,31,719 एवढे झाले आहेत.  राज्यात 1,49,214 रुग्ण आहेत त्यातले 46,345 रुग्ण हे पुण्यात आहेत. मुंबईत 1,059 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 45 जणांचा मृत्यू झाला. शहरात 20,749 सक्रिय रुग्ण आहेत. तर मृत्यूचा आकडा 6,395 एवढा झालाय.

दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर नियंत्रित  राखण्यात यश मिळ्याल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला होता. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत भारतीय व्हेंटिलेटर्सच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचा मृत्यूदर हा 2.15 टक्के असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताला लागणाऱ्या व्हेंटिलेटर्सची संख्या पुरेशी असल्याने निर्यातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता भारताचे व्हेंटिलेटर्स हे विदेशात कोरोना रुग्णांचे प्राण वाचविणार आहे.

भारताचे व्हेंटिलेटर्स विदेशात वाचवणार COVID रुग्णांचे प्राण, निर्यातीला परवानगी

त्याचबरोबर या निर्णयामुळे भारतीय कंपन्यांना फायदाही होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

देशात आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. देशासाठी ही दिलासा देणारी गोष्ट असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशाचा रिकव्हरी रेट हा 64.5 टक्के असून पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण हे 33.27 टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘अमेरिकेत 5 महिन्यात येणार COVID-19वर लस’, तज्ज्ञांच्या दाव्याने आशा वाढली

भारतातला मृत्यू दर हा कमी असून तो सध्या 2.15 टक्के एवढा आहे. जगात हा दर सर्वात कमी असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं. देशातल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये केवळ 0.28 टक्के रुग्णच हे व्हेंटिलेटर्सवर आहेत.

देशात 1.61 रुग्णांना ICU ची गरज आहे. तर 2.32 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता. ही संख्या आटोक्यात राहावी असा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या राज्यांना आत्तापर्यंत 268.25 लाख N 95 मास्क, 120.40 लाख पीपीई किट आणि 1083.77 लाख HCQच्या गोळ्यांचा पुरवढा केल्या गेल्याची माहितीही त्यांनी दिली.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 1, 2020, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading