Home /News /mumbai /

COVID-19: राज्यात आज पुन्हा 9 हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची भर, एकूण संख्या गेली 4 लाखांवर

COVID-19: राज्यात आज पुन्हा 9 हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची भर, एकूण संख्या गेली 4 लाखांवर

मुंबईतल्या 24 मधल्या 4 वॉर्डांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर हा 100 दिवसांपेक्षाही जास्त झाला आहे. तर 2 वॉर्डांमध्ये तो 90 दिवसांवर गेला आहे.

मुंबईतल्या 24 मधल्या 4 वॉर्डांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर हा 100 दिवसांपेक्षाही जास्त झाला आहे. तर 2 वॉर्डांमध्ये तो 90 दिवसांवर गेला आहे.

मुंबईत रुग्ण दुप्पटीचा कालावधीदेखील आता 70 दिवसांच्या पार गेला असून सक्रिय रुग्णांची संख्याही 18 हजारापेक्षा कमी झाली आहे.

    मुबंई 29 जुलै: राज्याने आज कोरोना रुग्णांच्या संख्येने 4 लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासांमध्ये 9211 रुग्णांची वाढ झाली. गेली दोन दिवस नव्या रुग्णांच्या संख्येत थोडी घट झाली होती. मात्र आज पुन्हा एकदा नव्या रुग्णांनी 9 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर 7478 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर 298 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 4 लाख 651 एवढी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट 59.84 एवढा झाला आहे. सर्व देशात मुंबई कोरोनाचा हॉट स्पॉट ठरला होता. महापालिका, राज्य सरकार यांनी केलेल्या प्रयत्नांचे आता परिणाम दिसत आहेत. काहीसा दिलासा देणारी आकडेवारी समोर आली असून या सकारात्मक परिणामांमुळे कोरोना विरुद्ध लढणाऱ्या सगळ्यांचाच उत्साह वाढणार आहे. मुंबईत मंगळवारी 28 जुलै 2020ला एकाच दिवसात 11 हजार 643 चाचण्या घेण्यात आल्या, हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. मुंबईतला रुग्ण वाढीचा सरासरी दरही आता 1 टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधीदेखील आता 70 दिवसांच्या पार गेला असून सक्रिय रुग्णांची संख्याही 18 हजारापेक्षा कमी झाली आहे. मुंबईने करून दाखवलं; नव्या रुग्णांच्या संख्येत घट तर 5 लाख चाचण्या 3 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली होती. 3 फेब्रुवारी ते 6 मे 2020 या कालावधीमध्ये मुंबईत 1 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. नंतर 1 जून 2020 रोजी 2 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. त्यानंतर 24 जून 2020 रोजी 3 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. म्हणजे 2 लाख ते 3 लाख हा टप्पा 23 दिवसांत गाठला गेला. तर 14 जुलै 2020 रोजी 4 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. 3 लाख ते 4 लाख चाचण्या हा टप्पा 20 दिवसांत पार पडला. बुधवार 5 जुलै 2020 रोजी लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला असून 4 लाख ते 5 लाख चाचण्यांचा टप्पा अवघ्या 15 दिवसांमध्ये गाठण्यात आला आहे. मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. BREAKING : Unlock 3.0 चे नवे नियम केंद्राने केले जाहीर; लवकरच जिम होणार सुरू मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 1 टक्क्याच्याही खाली आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता 72 दिवसांचा झाला आहे. रुग्ण दुप्पट होण्यासाठी अधिक कालावधी म्हणजे संसर्गाचा फैलाव तितकाच मंदावला, असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधीदेखील सातत्याने वाढता असून संसर्गावर नियंत्रण मिळाल्याचे ते द्योतक आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. या दुहेरी कामगिरीमुळे उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता कमी होऊ लागली आहे. आजपर्यंत मुंबईत 1 लाख 10 हजार 846 रुग्ण आढळले, पैकी 83 हजार 97 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर सध्या एकूण 17 हजार 862 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता 18 हजारापेक्षाही कमी झाली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या