Home /News /mumbai /

COVID-19: राज्यात गेल्या काही महिन्यातली सर्वात कमी रुग्ण वाढ, मृत्यूच्या संख्येतही घट कायम

COVID-19: राज्यात गेल्या काही महिन्यातली सर्वात कमी रुग्ण वाढ, मृत्यूच्या संख्येतही घट कायम

शहरात सध्या 16,262 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण थोडा कमी झाला आहे.

शहरात सध्या 16,262 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण थोडा कमी झाला आहे.

मुंबईतल्या रुग्णांचा एकूण संख्या ही 2,43,169 एवढी झाली आहे. तर शहरात आत्तापर्यंत 9 हजार 819 जणांचा मृत्यू झाला आहे.

  मुंबई 19 ऑक्टोबर: राज्यातला कोरोना रुग्णांचा चढता आलेख आता घसरणीला लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या घसरणीत सातत्य असून त्यामुळे थोडा दिला मिळाला आहे. राज्यात सोमवारी (19 ऑक्टोबर) गेल्या कित्येक महिन्यात सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद झाली. तसच मृत्यूच्या संख्येतही लक्षणिय घट झाल्याचं आढळून आलं आहे. दिवसभरात राज्यात 5 हजार 984 रुग्णांची नोंद झाली तर 125 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून नव्या रुग्णांची संख्या ही 12 हजारांच्या वर राहात होती. तर मृत्यूचा आकडाही 300च्या जवळ स्थिर झाला होता. आज मागील तीन महिन्यात सर्वांत कमी मृत्यूची नोंद झाल्याचं आढळून आलं आहे. आज 15 हजार 69 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ही 13 लाख 84 हजार 879 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.48 टक्के एवढे झाले आहे. राज्यात दिवसभरात 5 हजार 984 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 16 लाख 1 हजार 365 एवढी झालीय. तर आत्तापर्यंत एकूण 42,240 जणांचा मृत्यू झालाय. ठाणे पालिकेच्या COVID हॉस्पिटलमध्ये मुन्ना भाई MBBS, प्रशासन गेलं हादरून मुंबईत 24 तासांमध्ये 1234 नवे रुग्ण आढळले. तर 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या रुग्णांचा एकूण संख्या ही 2,43,169 एवढी झाली आहे. तर शहरात आत्तापर्यंत 9 हजार 819 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातही दिलासा देणारं चित्र कोरोनाशी लढा देणाऱ्या पुणेकरांसाठी चांगली बातमी आहे. गेल्या 15 दिवसांपेक्षा जास्त काळापासून नव्या कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूमध्येही होत असलेली घट कायम आहे. सातत्याने रुग्णांच्या संख्येत घट कायम राहणे हे सकारात्मक चिन्ह असल्याचं म्हटलं जातंय. सोमवारी दिवसभरात पुण्यात 214 नव्या रुग्णांची भर पडली. ही गेल्या काही काळातली ही निच्चांकी संख्या समजली जाते. तर दिवसभरात 505 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात पुण्यात 27 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 9 रुग्ण पुण्याबाहेरचे आहेत. पुण्यात 799 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 434 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 1 लाख 57 हजार 631 एवढी झाली आहे. पुण्यात सध्या 9 हजार 198 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाग्रस्त महिलेसाठी राडा; अ‍ॅम्ब्युलन्सची तोडफोड, मारहाण करत महिलेला पळवलं पुण्यात आत्तापर्यंत 40001 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकूण 1 लाख 44 हजार 432 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पुणे शहरात मायक्रो कंटेन्मेंट झोनचीही  पुनर्रचना करण्यात आलीय. आता अवघे 33 मायक्रो कंटेन्मेंट झोन्स असणार आहेत.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या