राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येतली वाढ कायम, मृत्यूचा आकडा घसरला; सरकार लागलं कामाला

राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येतली वाढ कायम, मृत्यूचा आकडा घसरला; सरकार लागलं कामाला

रुग्ण संख्या वाढत असल्याने सरकारही कामाला लागलं असून चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हा स्तरावरही सर्व आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई 22 नोव्हेंबर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आज बऱ्याच दिवसांनी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 5 हजार 753 रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 60 रुग्णांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले. राज्याचा Recovery Rate 92.75 एवढा झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 51 हजार 64 एवढी झालीय. राज्यात मृत्यूत आज घट दिसून आली. गेल्या 24 तासांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 17 लाख 80 हजार 208 एवढी झाली आहे.

रुग्ण संख्या वाढत असल्याने सरकारही कामाला लागलं असून चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हा स्तरावरही सर्व आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून जग कोरोनासारख्या महासाथीचा (coronavirus) सामना करीत आहे. काही देशांमध्ये शिथिल केलेलं लॉकडाऊन पुन्हा कडक केलं जात आहे. त्यात शाळादेखील पुढल्या वर्षी सुरू करण्याबाबत समर्थन दिलं जात आहे. याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर झाल्याची माहिती युनिसेफकडून (Unicef) दिली गेली आहे. पुढल्या वर्षात कोरोनाचा धोका कायम राहिल्यास एका पिढीचं भविष्य धोक्यात येईल, असा इशारा युनिसेफने दिला आहे.

यासाठी युनिसेफने 140 देशांमध्ये पाहणी केली. या संशोधनानुसार सध्याच्या पिढीसमोर 3 प्रकारचे धोके दिसून आले आहेत. यामध्ये कोरोना महासाथीचा परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरीबी याशिवाय विषमतेचा समावेश करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नियमित लसीकरण होत नाही. याबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. जर या आरोग्य सुविधा नियमित दिल्या गेल्या नाही तर 20 लाख मुलांचा पुढील 12 महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. दुसरीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तरुण पिढीची काम करण्याची क्षमताही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही त्या अभ्यासात म्हटलेलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 22, 2020, 7:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading