राज्यात COVID-19 रुग्ण बरे होण्याचा विक्रम, 26 हजारांपेक्षा जास्त जण घरी परतले

राज्यात COVID-19 रुग्ण बरे होण्याचा विक्रम, 26 हजारांपेक्षा जास्त जण घरी परतले

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 12 लाख 8 हजार 642 एवढी झाली आहे.

  • Share this:

मुंबई 20 सप्टेंबर: राज्यात रविवारी कोविड रुग्ण बरे होण्याचा विक्रम झाला. दिवसभरात तब्बल 26 हजार 408 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. सलग चौथ्या दिवशी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक झालं आहे. 8 दिवसात बरे झालेल्या रुग्णाची टक्केवारी 70 वरून 73वर गेली आहे.  आत्तापर्यंत 8 लाख 84 हजार 384 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 20 हजार 598 नवे रुग्ण सापडले. तर 455 रुग्णांचा मृत्यू झाला.

त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 12 लाख 8 हजार 642 एवढी झाली आहे. राज्या प्रमाणेच देशतही  कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच काही दिलासादायक आकडेवारीही समोर आली आहे. दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांनी उच्चांक गाठला आहे.

गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 94,612 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची देशातली संख्या ही 43 लाख झाली आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट 79.68 टक्के एवढा झाला आहे.

कोरोनावरची पहिली लस आरोग्य मंत्र्यांनीच घेतली; लोक म्हणाले, मानलं तुम्हाला!

नवे रुग्ण आढळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 23 हजारांच्या आसपास नवे पेशंट आढळून येत आहेत.

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी 60 टक्के पेशंट आहेत.

सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आता घरातच क्वारंटाइन करणार, हॉस्पिटल्समध्ये बेडच नाहीत

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने 52 लाखांचा आकडा पार केला आहे. तर मृत्यूची संख्या ही 85 हजारांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 96 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 20, 2020, 8:08 PM IST

ताज्या बातम्या