मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने मोडले सर्व विक्रम, दिवसभरात 23 हजार 350 जणांची भर

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने मोडले सर्व विक्रम, दिवसभरात 23 हजार 350 जणांची भर

महाराष्ट्रात शनिवारी 5 हजार 500 रुग्ण आढळून आलेत. तर 7 हजार 303 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आलं.

महाराष्ट्रात शनिवारी 5 हजार 500 रुग्ण आढळून आलेत. तर 7 हजार 303 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आलं.

राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या 9 लाख 7 हजार 212वर गेली आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar
मुंबई 6 सप्टेंबर: कोरोना रुग्णांच्या संख्येने रविवारी सर्व विक्रम मोडले आहेत. राज्यात 24 तासांमध्ये तब्बल 23 हजार 350 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तर 328 रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यातला मृत्यू दर 2.92 एवढा झाला आहे. दिवसभरात 7826 रू्गणांना डिस्चार्ज मिळाला. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 71.03 एवढं आहे. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या 9 लाख 7 हजार 212वर गेली आहे. राज्यात 2 लाख 35 हजार 857 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, भारतातही कोरोना रुग्णांचा संख्या दररोज वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर 80 हजारांच्यावर नवे रुग्ण निघत आहेत. भारताची लोकसंख्या जास्त असल्याने अजुन काही दिवस आकडेवारी अशीच राहणार असल्याची शक्यता AIIMSचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS Director Randeep Guleria) यांनी व्यक्त केली. हेटाळणीच्या नजरा.. आणि अनिश्चिततेच्या गर्तेत अडकली पुण्यातील 'बदनाम गल्ली!' देशातल्या काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे असं मतही त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं.देशात दररोज 10 लाख टेस्टिंग होत आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांचा आकडा जास्त असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. 2021पर्यंत कोरोना राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र त्याबाबत नक्की काहीच सांगता येणार नाही असंही ते म्हणाले.देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 41 लाखांच्या जवळ म्हणजे 40,96,690 लाख एवढी झाली आहे. एखाद्या व्यक्तीला एकदा कोरोनाव्हायरस (Covid-19) झाल्यानंतर त्याला पुन्हा कोरोनाची लागण होऊ (Coronavirus reinfection) शकते का? तर आता अशी काही प्रकरणं समोर येऊ लागली आहे. आधी हाँगकाँग आणि आता भारतातही असं प्रकरण दिसून आलं आहे. भारतातही कोरोनामुक्त व्यक्तीला पुन्हा कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. मुंबईपाठोपाठ आता बंगळुरू शहरातही असं प्रकरण समोर आलं आहे. बॉयफ्रेंड अर्जुन कपूरनंतर अभिनेत्री मलायका अरोरालाही कोरोना भारतात कोव्हिड-19 हा आजार उलटण्याचं दुसरं प्रकरण समोर आलं आहे. आधी मुंबईतील एका महिलेला पुन्हा कोरोनाची लागण झाली होती. आता बंगळुरूतील महिलाही पुन्हा संक्रमित झाली आहे. ANI या वृत्तसंस्थेने बंगळुरूतील खासगी रुग्णालयातील महिलेला कोरोनाचं रिइन्फेक्शन झाल्याचं सांगितलं आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या