COVID-19: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा उच्चांक, 24 तासांत 32 हजारांपेक्षा जास्त जणांना डिस्चार्ज

COVID-19: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा उच्चांक, 24 तासांत 32 हजारांपेक्षा जास्त जणांना डिस्चार्ज

रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 24 हजार 380 एवढी झाली आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

  • Share this:

मुंबई 21 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सोमवार दिलासा देणारा ठरला. दिवसभरात राज्यात तब्बल 32 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 9 लाख 16 हजार 348 एवढी झाली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 74.84 एवढं झालं आहे. तर राज्यात 24 तासांत 15 हजार 738 नवे रुग्ण आढळून आलेत तर 344 जणांचा मृत्यू झाला. मृत्यूची टक्केवारी 2.7 एवढी झाली आहे. राज्यात 2 लाख 74 हजार 623 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 24 हजार 380 एवढी झाली आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५९,१२,२५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,२४,३८० (२०.७१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १८,५८,९२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,५१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

जगभरात आता अमेरिकेखालोखाल भारतातली रुग्णसंख्या आहे. आपल्याकडे कडक Lockdown काळात सुरुवातीला कोरोना आटोक्यात होता. मात्र लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर आले. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

FACT CHECK : घसा कोरडा पडला म्हणजे Coronavirus चा संसर्ग होण्याची भीती जास्त?

सध्या भारतातील रुग्णांची संख्या दररोज 1 लाखांच्या दरम्यान वाढत आहे. यामध्ये भर पडताना दिसून येत आहे. भारतात इतक्या वेगाने कोरोना कसा काय पसरत आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यामागील एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजीच्या (centre for cellular and molecular biology, Hyderabad) संशोधनात समोर आले आहे की, भारतात कोरोनाच्या  A2a या स्ट्रेनने मोठ्या प्रमाणात रुग्ण संक्रमित केले आहेत.

Corona vaccine घेण्यासाठी नाही इंजेक्शनची गरज; आता आली वेदनाविरहित कोरोना लस

देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी (Covid-19 patients) 70 टक्के रुग्ण हे A2a स्ट्रेनमुळे संक्रमित  झाले आहेत. त्यामुळे भारतात दररोज इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. जगभरात देखील A2a स्ट्रेनमुळे  मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोना संक्रमित होत आहेत. सुरुवातीला भारतात A3i स्ट्रेनमुळे कोरोना संक्रमित रुग्णांचं प्रमाण 41 टक्के होतं पण ते नंतर कमी होत गेलं.  मात्र आता रुग्ण A2a स्ट्रेनने कोरोना संक्रमित होत असल्यामुळं संख्या वाढताना दिसून येत आहे. जगभरात देखील याच प्रकारच्या कोरोना व्हायरसवर लस तयार करण्याचे काम सुरु आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 21, 2020, 8:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading