Home /News /mumbai /

COVID-19: राज्यात दिवसभरात 391 जणांचा मृत्यू, 22 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

COVID-19: राज्यात दिवसभरात 391 जणांचा मृत्यू, 22 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

तर दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने सगळ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

तर दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने सगळ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून दररोज 20 हजारांपेक्षा जास्त रुग्ण निघत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे.

  मुंबई 12 सप्टेंबर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नव्या रूग्णांची वाढ कायमच आहे. शनिवारी दिवसभरात 22,084 नवे रुग्ण आढळले. तर 391 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 10,37,765 एवढी झाली आहे. तर मृत्यूसंख्या 29,115 एवढी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 20 हजारांपेक्षा जास्त रुग्ण निघत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. राज्यात दिवसभरात 13 हजार 489  रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.81 एवढा झाला आहे. राज्यात सध्या  2,79,768 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढण्यास पूर्ववत झालेले व्यवहार, वाढणारी गर्दी, लोकांचा बेफिकीरपणा, मास्क न लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं ही मुख्य कारणं आहेत असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्याचबरोबर टेस्टिंगची संख्याही वाढत असल्याने रूग्णांचं प्रमाणही वाढत आहे.कोरोनाची प्रसार आता ग्रामीण भागात झाल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असतांनाच आता कोरोनाची भीती कमी होत आहे. त्यामुळे लोक जास्त बेफिकीर झाल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे. पुन्हा सुरू होणार Oxford च्या कोरोना लशीची चाचणी; का थांबवलं होतं कंपनीने ट्रायल दरम्यान, सर्व जगाचं लक्ष लागलेल्या AstraZeneca आणि Oxfordने विकसित केलेल्या लशींच्या चाचण्यांवरची बंदी उठविण्यात आली आहे. या लशीच्या मानवी चाचण्यांदरम्यान एका व्यक्तिची प्रकृती बिघडल्याने सरकारने तात्पुरती बंदी घातली होती. ब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचं सांगितलं आहे. या निर्णयाचा संशोधनाला मोठा फायदा होणार असून आता भारतासह जगभरात सुरू असलेल्या चाचण्या पुन्हा सुरू होणार आहेत. 'लिक्विड ऑक्सिजन' आत्मनिर्भरतेचा जालना पॅटर्न; राजेश टोपे यांची मोठी घोषणा या औषधाच्या चाचण्या या पूर्णपणे सुरक्षीत असल्याचं MHRAने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने या चाचण्या थांबिण्यात आल्या होत्या. त्यावर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली आहे. भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या