Home /News /mumbai /

COVID-19: महाराष्ट्र हादरला, 24 तासांत आढळले 20 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

COVID-19: महाराष्ट्र हादरला, 24 तासांत आढळले 20 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

महाराष्ट्रात शनिवारी 5 हजार 500 रुग्ण आढळून आलेत. तर 7 हजार 303 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आलं.

महाराष्ट्रात शनिवारी 5 हजार 500 रुग्ण आढळून आलेत. तर 7 हजार 303 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आलं.

राज्यातल्या कोरोना रुग्णाची एकूण संख्या 8 लाख 83 हजार 862 एवढी झाली आहे.

    मुंबई 05 सप्टेंबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी वाढ होत आहेत. शनिवारी आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आढळली. 24 तासांमध्ये तब्बल 20 हजार 489  नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 312 मृत्यू झाला. राज्यात सध्या 2 लाख 20 हजार 661 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यातल्या कोरोना रुग्णाची एकूण संख्या 8 लाख 83 हजार 862 एवढी झाली आहे. दरम्यान,  मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढत असतांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबई महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक आणि अधिष्ठाता यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढवा घेतला यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रासाठी पुढचे तीन महिने धोक्याचे आहेत. राज्यात ऑक्सिजनचं उत्पादन वाढविण्यात येणार आहे. लोकांनीही निष्काळजीपणा न दाखवता जागरुक राहावे. त्यामुळे कोरोनाचं संकट आपण रोखू शकतो असं मतही त्यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अनलॉक केल्यानंतर मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही निश्चितच काळजीची गोष्ट असली तरी मुंबई पालिकेची सक्षम तयारी पाहिल्यानंतर मला खात्री आहे आपण हा प्रादुर्भाव चांगल्यारीतीने रोखू शकू. चेस दि व्हायरस मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. 80 ते 85 टक्के रुग्ण या भागातून आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या