राज्यात आत्तापर्यंतची विक्रमी 19 हजार रुग्णांची वाढ, मुंबईसह 5 जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

राज्यात आत्तापर्यंतची विक्रमी 19 हजार रुग्णांची वाढ, मुंबईसह 5 जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

सगळे व्यवहार सुरु झाल्याने ही संख्या वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

  • Share this:

मुंबई 4 सप्टेंबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये विक्रमी 19 हजार 218 रुग्णांची वाढ झालीय. आत्तांपर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. कोरोनाचा प्रसार आता ग्रामीण भाग होत असून मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 1929 रुग्ण आढळले.

राज्यात 2 लाख 10हजार 978  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 8 लाख 63 हजार 062वर गेली आहे.

राज्यात दिवसभरात 378 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 13 हजार रुग्ण बरे होऊन घरी. सगळे व्यवहार सुरु झाल्याने ही संख्या वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण  7724 कोरोनाग्रस्त (Mumbai coronavirus) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे, याचा अभ्यास करण्यात आला. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं ऑडिट करण्यात आलं. मृत्यूच्या कारणांचा ताजा अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जीवशैलीशी संबंधित आजारांमुळे  77 टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

इतर आजार असलेल्या रुग्णांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे आणि याच आजारांमध्ये कोरोनाव्हायरस झाला तर त्या व्यक्तीला मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे. मुंबईतील मृत्यूच्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट होते आहे. मुंबईत मृत्यू झालेल्या 5800 रुग्णा रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी 77 टक्के रुग्णांना इतर आजार होते.

सावधान! हिवाळ्यात वाढू शकतो कोरोनाचा प्रसार, तज्ज्ञांनी दिला इशारा

देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर संख्येत विस्फोट झाल्यासारखी स्थिती असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

रुग्ण संख्या वाढत असतांनाच शिमल्याच्या IGMC हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर जनक यांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

हिवाळ्यात कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती डॉ. जनक यांनी व्यक्त केली आहे. लोकांनी जास्तित जास्त काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हिवाळ्यात ओलावा जास्त असल्याने कोरोना व्हायरस जास्त काळ जिवंत राहू शकतो. त्यामुळे त्याच्या प्रसाराची भीती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

‘कोरोना’मुक्त झालेल्या 40 टक्के रुग्णांना पुन्हा धोका, नव्या अभ्यासातला निष्कर्ष

कोरोनातून बरं झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूपच कमी असतो असं म्हटलं जात होतं. मात्र नव्या अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

या संदर्भात अहमदाबातमध्ये एक अभ्यास करण्यात आला आहे. त्यात कोरोनामुक्त झालेल्या 40 टक्के रुग्णांच्या शरीरांमधले अँटीबॉडीज संपल्याचं आढळून आलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 4, 2020, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading