कोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ

कोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ

राज्यात बरे होण्याचं प्रमाण हे 75.86 एवढं झालं आहे. तर मृत्यू दर 2.68 एवढा आहे.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर: राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. राज्यात गुरूवारी दिवसभरात कोरोनानं 459 जणांचा बळी घेतला आहे. तर 19 हजार 164 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 82 हजार झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 17 हजार 184 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आत्तापर्यंत 9 लाख 73 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 74 हजार 996 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात बरे होण्याचं प्रमाण हे 75.86 एवढं झालं आहे. तर मृत्यू दर 2.68 एवढा आहे.

देशात कोरोनाचे नव्यानं संसर्ग होणाऱ्यांची संख्या जरी वाढत असली तरी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ही आकडेवारी थोडी कमी असल्याचं आणि रिकव्हरी रेट चांगल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्रालयाकडून आलेल्या नवीन आकडेवारीनुसार 24 तासांत 86 हजार 506 लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून देशात आतापर्यंत कोरोनाचा आकडा 57 लाखावर पोहोचला आहे.

मालिकांनंतर फिल्म सेटवर कोरोना; 2 अभिनेते पॉझिटिव्ह, अर्जुन रामपालची अशी अवस्था

या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास 90 आणि त्यानंतरच्या आठवड्यात 97 हजारापर्यंत दिवसाला रुग्ण वाढत होते. मात्र आज हा आकडा कमी असून केवळ 86 हजार 506 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

लवकरच होणार धोकादायक ट्रायल; मानवी शरीरात मुद्दाम सोडणार जीवघेणा कोरोनाव्हायरस

दरम्यान देशात सध्या 9 लाख 66 हजार 382 कोरोनाग्रस्त रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. देशात कोरोनामुळे 24 तासांत 1, 129 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतही संख्या 91 हजार 149 वर पोहोचली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 24, 2020, 8:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading