COVID-19: राज्यात 4 महिन्यातली सर्वात कमी मृत्यू संख्या, रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ

दिवसभरात 11 हजार 900 नवे रुग्ण आढळून आलेत. सध्या राज्यात 2 लाख 65 हजार रुग्ण उपचार घेत आहेत.

दिवसभरात 11 हजार 900 नवे रुग्ण आढळून आलेत. सध्या राज्यात 2 लाख 65 हजार रुग्ण उपचार घेत आहेत.

  • Share this:
    मुंबई 28 सप्टेंबर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून समाधानकारक बातमी आली आहे. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तर मृत्यूदरातही घट झाली आहे. राज्यात सोमवारी (28 सप्टेंबर)  19 हजार 932 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर दिवसभरात 180 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात कमी मृत्यू संख्या आहे. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 77.71 एवढी झाली आहे. दिवसभरात 11 हजार 900 नवे रुग्ण आढळून आलेत. सध्या राज्यात 2 लाख 65 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, कोरोनाव्हायरसवर प्रभावी असं औषध नाही. मात्र कोरोनामुळे उद्भवणाऱ्या लक्षणांनुसार सध्या विविध आजारांवर उपलब्ध असलेल्या औषधांनी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या ज्या औषधांनी कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत, त्या औषधांपेक्षाही प्रभावी असं औषध भारतीय शास्त्रज्ञांना सापडलं आहे. IIT दिल्लीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसविरोधात अधिक परिणामकारक असं औषध शोधून काढलं आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायोलॉजिकल मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सांगली: कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या, धारधार शस्त्राने कापला गळा हे औषध म्हणजे टिकोप्‍लेनिन. जे ग्‍लायकोपेप्‍टाइड अँटिबायोटिक औषध आहे. मानवी शरीरातील कमी टॉक्सिक असलेल्या ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिअल इन्‍फेक्‍शन्सवर उपचार म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जातात. जगभरात थैमान घातले आहे. अशा परिस्थिती आता तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट नाही झाले आहे, कोरोनाच्या कोणत्या स्थितीला नवीन लाट म्हणावे. यातच यूकेच्या एडिनबर्ग विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे प्राध्यापक मार्क वूलहाऊस यांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. नवी समस्या! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये दिसत आहे 'या' आजाराची लक्षणं independent.co.uk च्या रिपोर्टनुसार, ब्रिटिश कोरोना तज्ज्ञ मार्क वूलहाऊस म्हणतात की, लॉकडाऊनमुळे कोरोना दूर करत नाही, तर समस्या थोडीशी वाढते. ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, आणि देशात आता पुन्हा राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर करण्याची परस्थिती आली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published: