मुंबई 25 सप्टेंबर: कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण शुक्रवारी पुन्हा वाढलं आहे. शुक्रवारी 19 हजार 592 रुग्ण बरे झाले. तर 17 हजार 794 नवे रुग्ण आढलले आहेत. तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली नसून शुक्रवारी 416 जणांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 76 टक्यावर गेलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र गुरुवारी नवे रुग्ण जास्त आढळून आले होते. शुक्रवारी (25 सप्टेंबर) पुन्हा डिस्चार्ज होणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी काय होती स्थिती
राज्यात गुरूवारी दिवसभरात कोरोनानं 459 जणांचा बळी घेतला होता. तर 19 हजार 164 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 17 हजार 184 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.
कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचावासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत. जगभरात कोरोनाच्या लशीवर (Corona vaccine) संशोधन सुरू आहे. पण लस येईपर्यंत सर्वात प्रभावी उपाय म्हणून सॅनिटायझर, मास्क, प्लॅस्टिक शिल्डचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करण्यात येत आहे.
नागरिकांनो सावध राहा! कोरोना विषाणूनंतर आता ब्रुसेलोसीसचं संकट
पण विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्रास वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक शिल्ड फारशा उपयुक्त नसल्याचं नवीन संशोधनातून समोर आलं आहे.
सॅनिटायझरनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक जगभरात प्लॅस्टिक शिल्डचा वापर करताना दिसून येत आहेत. पण ही प्लॅस्टिक शिल्ड सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. जपानमध्ये यासंबंधित संशोधन करण्यात आलं .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.