राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली, 15 हजारांपेक्ष जास्त जणांनी COVIDला हरवलं

राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली, 15 हजारांपेक्ष जास्त जणांनी COVIDला हरवलं

मुंबईतला रुग्णांचा आकडा हा वाढलेला असून दिवसभरात 2 हजार 109 एवढे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:

मुंबई 04 ऑक्टोबर: कोरोना विरुद्धच्या लढाईत चिंता वाढलेली असताना रविवारी दिलासादायक आकडेवारी समोर आली. सलग दोन दिवस कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी 15 हजार 48 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर राज्यात 13 हजार 702 नवे रुग्ण आढळून आलेत. तर दिवसभरात 326 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 2 लाख 55 हजार 281 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तर रुग्णांची एकूण संख्या ही 14 लाख 43 हजार 409 एवढी झाली आहे. मुंबईतला रुग्णांचा आकडा हा वाढलेला असून दिवसभरात 2 हजार 109 एवढे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 जणांचा मृत्यू झाला.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. पुण्यातही रुग्ण संख्येचा आलेख वाढत असून एकूण संख्या ही दीड लाखांच्या जवळ गेली आहे.

रविवारी दिवसभरात शहरात 933 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर  दिवसभरात 1 हजार 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

पुण्यात 55 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यात 17 रूग्ण हे पुण्याबाहेरचे आहेत. पुण्यात 899 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 504 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 49 हजार 399 एवढी झाली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही 15 हजार 399 एवढी झाली आहे.

कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ही 3 हजार 647 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 1 लाख 30 हजार 353 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 4, 2020, 9:26 PM IST

ताज्या बातम्या