Home /News /mumbai /

COVID-19: बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ, दिवसभरात 16 हजारांपेक्षा जास्त जणांची कोरोनावर मात

COVID-19: बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ, दिवसभरात 16 हजारांपेक्षा जास्त जणांची कोरोनावर मात

बुधवारी पुण्यात 3 हजार 581 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.

बुधवारी पुण्यात 3 हजार 581 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 79.3 टक्के आहे. दिवसभरात 14 हजार 348 नवे रुग्ण आढळले आहेत.

    मुंबई 03 ऑक्टोबर: राज्यात शनिवारी पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 16 हजार 835 जणांनी कोरोनावर मात केली त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 34 हजार 555 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 79.3 टक्के आहे. दिवसभरात 14 हजार 348 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 278 जणांचा मृत्यू झाला. राज्यातला मृत्यूदर 2.64 एवढा झाला आहे. कोरोनावर सर्व जगभर संशोधन सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती महाभयंकार कोरोनाला रोखणाऱ्या लशीची यात ऑक्सफर्डची लस (Oxford Vaccine) सर्वात आघाडीवर आहे. आता नव्या अभ्यास अहवालात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पुढच्या तीन महिन्यांमध्ये ही लस तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्रिटनमधल्या ‘टाईम्स’ या वृत्तपत्राने वैज्ञानिकांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. ऑक्सफर्डच्या लशीच्या (Oxford Vaccine)  सध्या मानवी चाचण्या सुरू आहेत. कोरोनाची स्वॅब टेस्ट बेतली महिलेच्या जीवावर; थोडक्यात बचावली, नेमकं काय घडलं दरम्यान,  राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत आज आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली. मिशन बिगीन अगेनअंतर्गत येत्या 5 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमते एवढच हॉटेल्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर– सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंटस् आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे एसओपीची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सगळ्यांनी तंतोतत पालन करावे असं आवाहन सरकारने केले आहे. कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा. खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी. "मी खोटं कसं बोलू पण...", बॉलिवूडमधील ड्रग्जबाबत अक्षय कुमारचा VIDEO तून खुलासा संबंधीत आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परिसरातील महत्वाच्या ठिकाणी ते उपलब्ध करण्यात यावेत. डिजीटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे अशा सूचना दिल्या आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या