Home /News /mumbai /

COVID-19: राज्यात कोरोनाचा विस्फोट, 18 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर; 391 जणांचा मृत्यू

COVID-19: राज्यात कोरोनाचा विस्फोट, 18 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर; 391 जणांचा मृत्यू

तर  दिवसभरात 1 हजार 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

तर दिवसभरात 1 हजार 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 8 लाख 43 हजार 844 एवढी झाली आहे.

मुंबई 03 सप्टेंबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी भर पडत आहे. आज तब्बल 18 हजार 105 नव्या रुग्णांची भर पडली. तर 391 जणांचा मृत्यू झाला. तर 13 हजार 988 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. एकूण 6 लाख 12 हजार 484 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 72.58 एवढं झालं आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 8 लाख 43 हजार 844 एवढी झाली आहे. देशात आणि राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असतांनाच महाराष्ट्रासाठी दिलासा देणारी गोष्टी पुढे आली आहे. राज्यात गेल्या तीन आढवड्यांमध्ये Active रुग्णांच्या संख्येत घट झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रातील Active रुग्णांच्या संख्येत 7 टक्क्यांची घट झाली अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली. आतापर्यंत देशात 4 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 11 लाख 72 हजार कोरोना टेस्ट करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही 29 लाख 70 हजारांवर गेली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या पाच राज्यांमध्ये देशातले 62 टक्के रुग्ण आहेत. 'खाल्ल्या मिठाला जागत होते म्हणून अधिकाऱ्यांच्या बदल्या' त्याचबरोबर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्येच देशातल्या एकूण मृत्यूंच्या 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनामुळे जगभर सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. व्हायरसला दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझर गरजेचं आहे. मात्र त्याचा अतिवापर आणि काळजी न घेता वापर केला तर ते जवावर बेतू शकतं. सॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असल्याने आग लागू शकते. त्यामुळे वापर करतांना ते आगीच्या संपर्कात यायला नको याची काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सॅनिटायझरमुळे आग लागून भाजल्याने मृत्यू झाल्याच्या काही घटना महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये घडल्या आहेत. सुसाट...! 10वीच्या विद्यार्थ्याने भंगारातून बनवली बाईक, 80 किमीचा आहे Average सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे त्वचेचे विकार झाल्याच्या घटनाही पुढे आल्याने डॉक्टरांनीही इशारा दिला होता. त्याच बरोबर पेट्रोल पंप, फॅब्रिकेशन, वेल्डिंग होत असलेल्या ठिकाणां जवळ जात असतांना सॅनिटायझर जवळ बाळगणं धोक्याचं ठरू शकते. स्वयंपाक घरातही सॅनिटायझरची बॉटल किंवा स्प्रे ठेवणं हे जोखमीचं आहे. सतत सॅनिटायझरचा वापर करण्यापेक्षा साबनाने स्वच्छ हात धुतल्यास तेही तेवढच परिणामकारक ठरू शकतं.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या