राज्यात 17 हजार नव्या रुग्णांची भर, जाणून घ्या 24 तासांमधल्या कोरोनाच्या सर्व अपडेट्स

राज्यात 17 हजार नव्या रुग्णांची भर, जाणून घ्या 24 तासांमधल्या कोरोनाच्या सर्व अपडेट्स

राज्यात आजपर्यंत एकूण 7 लाख 55 हजार 850 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

  • Share this:

मुंबई 14 सप्टेंबर:  राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 17,066 नवीन रुग्णांचे निदान झालं. राज्यात आज 257 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.77% एवढा आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 10 लाख 77 हजार 374 एवढी झाली आहे. दिवसभरात 15,789 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 7 लाख 55 हजार 850 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 70.16% एवढे झाले आहे. राज्यात सध्या एकूण 2 लाख 91 हजार 256 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 53, 21,116 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 10, 77, 374 (20.2 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17,12,160व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 37, 198 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 311 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोना झालेल्या पोलिसांची एकूण संख्या 19,385 झाली आहे. त्यात 3,670 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर मृत्यू झालेल्या पोलीस जवानांची संख्या 194वर गेली आहे. तर 15,521 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

देशात कोरोना रुग्णांची (COVID-19 Patient) संख्या वाढत आहे. दररोज देशात 90 हजारांच्या आसपास नवे रुग्ण आढळून येत आहे. तर भारत आता जगात दुसऱ्या क्रमांकाचा कोरोनाबाधित देश झालाय. रुग्ण संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारच्या धोरणांवरही टीका केली जात आहे. लॉकडाऊनचा (Lockdown) काहीही फायदा झाला नाही असंही मत व्यक्त केलं जात आहे.

सरकारच्या एका निर्णयामुळे 38 हजार लोकांचा वाचला जीव, आरोग्य मंत्र्यांचाा दावा

या सगळ्या आरोपांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Harsh Vardhan)  यांनी उत्तर दिलंय. लॉकडाऊनचा निर्णय घेतला नसता तर आणखी 37-38 हजार जणांचा जीव गेला असता असं मत त्यांनी व्यक्त केलं.

लोकसभेत माहिती देतांना त्यांनी हा दावा केला. हर्षवर्धन म्हणाले, सरकारने उपाययोजना केल्यामुळे किमान 29 लाख लोकांना लागण होण्यापासून वाचविण्यात यश मिळालं. तर किमान 38 हजार लोकांचा जीव वाचला.

अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणी; 30 टक्के खासदार पॉझिटिव्ह, यात शिवसेनेचे 4 सदस्य

देशात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, तेलंगाना, ओडिशा, आसाम, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये देशात सर्वात जास्त कोरोनाचं संक्रमण झालं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 14, 2020, 9:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading