COVID-19: सलग तिसऱ्या दिवशी राज्यात विक्रमी 14 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, 297 जणांचा मृत्यू

COVID-19: सलग तिसऱ्या दिवशी राज्यात विक्रमी 14 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, 297 जणांचा मृत्यू

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 6,61,942 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 4,80,114 एवढे रुग्ण बरे झाले आहेत.

  • Share this:

मुंबई 22 ऑगस्ट: सलग तिसऱ्या दिवशी राज्यात 14 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 14,492 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 297 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 6,61,942 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 4,80,114 एवढे रुग्ण बरे झाले आहेत. तर 1,69,516 एवढ्या रुग्णांवर राज्यात उपचार सुरु आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.45 टक्के एवढे आहे. तर मृत्यू दर हा 3.27 एवढा आहे.

जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एएफपीच्या आकड्यांनुसार जगभरात कोविड-19 (Covid-19) च्या रुग्णांचा आतापर्यंत 8 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे संसर्ग झालेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार गेली आहे. वर्ल्ड ओ मीटरच्या आकड्यांनुसार संपूर्ण जगभरात 23,149,731 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामुळे 8 लाख 03 हजार 807 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 57 लाख, 32 हजार 515 रुग्ण कोरोनापासून ठीक झाले आहेत.

कोरोना संसर्गाच्या प्रकरणात अमेरिका जगभरात पहिल्या, ब्राजील दुसरा आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मृत्यूची सर्वाधिक संख्या अनुक्रमे अमेरिका, ब्राजील, मेक्सिको या देशात आहे. भारतात या यादीच चौथा क्रमांक आहे.

जगभर सध्या एकच प्रश्न विचारला जातोय. तो प्रश्न आहे कोरोनावर लस केव्हा मिळणार?  यावर जगभर संशोधन सुरु असून काही महिन्यांमध्ये ही लस तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही लस तयार झाली तर ती जगभर पोहोचवायची कशी ही सर्वात मोठी समस्या सध्या जगासमोर आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने WHO एक मेगा प्लान तयार केला आहे. तो सर्व देशांना दिला जाणार आहे. याची अंमलबजावणी सक्तीची नसली तरी तो मार्गदर्शक तत्व म्हणून उपयोगी होणार आहे.

कोरोनावर लस आली आणि ती फक्त प्रगत देशांमधल्याच लोकांना मिळाली तर ते जगावरचं आणखी एक मोठं संकट असेल असं WHO म्हटलं आहे.

कोरोनावर लस आली तर ती सर्वात आधी जगात सर्वाधिक गरज असलेल्या भागात पोहचावी, त्यानंतर त्या नुसार त्याचा क्रम असावा, गरीब देशांनाही ती योग्य वेळेत मिळावी असं WHOने म्हटलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 22, 2020, 8:12 PM IST

ताज्या बातम्या