धक्कादायक: राज्यात पुन्हा विक्रमी 14 हजार 888 नव्या COVID-19 रुग्णांची भर

धक्कादायक: राज्यात पुन्हा विक्रमी 14 हजार 888 नव्या COVID-19 रुग्णांची भर

राज्यात आज 295 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.21 % एवढा आहे.

  • Share this:

मुंबई 26 ऑगस्ट:  राज्यात बुधवारी पुन्हा एकदा विक्रमी 14 हजार 888 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ही 7 लाख 18 हजार 711वर गेली आहे. तर 7,637 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 5,22,427 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 72.69% एवढे झाले आहे.

राज्यात असलेले गणेशोत्सवाचं वातावरण त्यामुळे झालेली गर्दी. मास्क न वापरणं,  सोशल डिस्टन्सिंगचा वापर न  करणं यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचं बोललं जात आहे.

राज्यात आज 295 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.21 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३७,९४,०२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,१८,७११ (१८.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १२,६८,९२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण १,७२,८७३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मोठी बातमी: वाहतुकदारांना सरसकट टॅक्स माफ, बंद पडलेल्या वाहनांना सरकारचा धक्का!

अनेक भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. पण यात कोरोना रुग्णांसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या तब्बल 11287 रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

भारतात कोरोनापेक्षाही जीवघेण्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष; तज्ज्ञांनी व्यक्त केली

अशात मुंबईमध्ये 18 हजार 263 करोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. करोनामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची संख्या 1134 इतकी आहे. करोनावर मात करून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार 84 इतकी आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी 10 हजार 425 रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या कोविड रुग्णांचा एकूण आकडा 7 लाखांच्यावर गेला आहे. 7 लाख 3 हजार 833 जण कोरोना बाधित असल्याची माहिती देण्यात आलीय.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 26, 2020, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading