COVID-19: राज्यात रुग्णांच्या मृत्यू संख्येत घट नाही, दिवसभरात गेला 394 जणांचा बळी

COVID-19: राज्यात रुग्णांच्या मृत्यू संख्येत घट नाही, दिवसभरात गेला 394 जणांचा बळी

गुरुवारी 16,104 रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यातल्या बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही 11 लाख 4 हजार 423 एवढी झाली आहे.

  • Share this:

मुंबई 01 ऑक्टोबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत आहेत. मात्र मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यभरात तब्बल 394 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.65 टक्के एवढा आहे.

गुरुवारी 16,104 रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यातल्या बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही 11 लाख 4 हजार 423 एवढी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 78.84 एवढे झाले आहे.

राज्यात दिवसभरात 16 हजार476 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात तपासण्यात आलेल्या ६८,७५,४५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,००,९२२ (२०.३८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २१,७४,६५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,७२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण २,५९,००६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोरोनाच्या काळात आरोग्याशी संबंधित संशोधनांना विशेष महत्त्व आहे त्यात ते कोरोनाबद्दल असेल तर अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील गरोदर महिलांमध्ये कोरोनाच्या बाधेसंबंधी एक सर्वेक्षण नुकतंच करण्यात आलं. यामध्ये असं दिसून आलं की 1140 गरोदर महिलांपैकी 141 महिला कोरोनाबाधित आहेत. हे प्रमाण 12.3 टक्के होतं.

कोरोना चाचणीचा रिपोर्ट येताच रुग्णाने केली आत्महत्या, नदीपात्रात घेतली उडी

प्रसूतीसाठी हॉस्पटलमध्ये दाखल होताना या गरोदर महिलांची चाचणी केली तर 10 महिलांपैकी एका महिलेमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली नाहीत, असा निष्कर्ष मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्युट फॉर रीसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ (NIRRH) व ICMR या संस्थांनी केलेल्या अभ्यासातून काढण्यात आला आहे. युरोपियन जर्नल ऑफ ऑबस्ट्रेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी अँड रिप्रॉडक्टिव बायॉलॉजीमध्ये हा संशोधन प्रंबंध प्रकाशित करण्यात आला आहे.

प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या किंवा येत्या पाच दिवसांत प्रसूत होण्याची शक्यता असलेल्या गरोदर महिलांच्या तपासण्यांवरून हा अभ्यास करण्यात आला. महाराष्ट्रातील 15 हॉस्पिटलमध्ये 25 एप्रिल ते 20 मे 2020 या काळात दाखल झालेल्या महिलांची माहिती या अभ्यासासाठी घेण्यात आली.

सावधान! महाराष्ट्रात येतोय कोरोनापेक्षा भयंकर काँगो फीव्हर, जाणून या तापाविषयी

मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या 141गरोदर महिला आणि नायर हॉस्पिटलमध्ये असलेल्या 180 कोरोनाबाधित गरोदर महिलांची माहिती या अभ्यासासाठी घेण्यात आली होती. या अभ्यासातून असं लक्षात आलं की यापैकी फक्त 11.5 टक्के महिलांना कोरोनाची लक्षणं दिसत होती बाकीच्या 88.5 टक्के महिला कोरोनाबाधित असूनही त्यांच्यात तशी लक्षणं दिली नाहीत.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 1, 2020, 8:33 PM IST

ताज्या बातम्या