मुंबई 9 ऑगस्ट: राज्यात आज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा उच्चांक झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 13,348 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ही 3 लाख 51 हजार 710 एवढी झाली आहे. तर नव्या रुग्णांची संख्याही वाढली असून दिवसभरात 12,248 नवीन कोरोना रुग्ण नोंद झाली. आज राज्यात 390 रुग्णांचा मृत्यू. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68. 25 टक्के एवढे आहे. राज्यात आज 10 लाख 588 व्यक्ती घरात स्वतंत्र विलगीकरण यात आहेत तर 34 हजार 957 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण यामध्ये आहेत. राज्यात एक लाख 25 हजार 558 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोना व्हायरसने मुंबईत थैमान घातलं आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र सगळ्यांना चिंता होती ती धारावीची मात्र महापालिकेने राबविलेल्या ‘मिशन धारावी’चे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत.
‘मिशन धारावी’मुळे रुग्णांची संख्या कमी करण्यात यश आलं असून रविवारी फक्त 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत 5 तर दादर येथे 31 तर माहिममध्ये 17 नव्या रुग्णांची नोंद झाली.
ऑगस्टमध्ये भारतात सर्वात जास्त नवे कोरोना रुग्ण; ब्राझील, अमेरिकेलाही टाकलं मागे
धारावीत आता 88 अॅक्टिव्ह रूग्ण, दादर सेथे 458, तर माहीम येथे 272 अॅक्टिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. मिशन धारावीमध्ये धारावीतल्या हजारो लोकांची टेस्ट करण्यात आली. आणि लक्षणे आढळलेल्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आलं.
महापालिकेने धडक उपाय योजना केल्याने हे यश मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजना केल्यामुळेच धारावीत रुग्णांची संख्या घटली आल्याने प्रशासनाची चिंता कमी झाली आहे.
ब्रिटन आणि अमेरिकेत केलेल्या संशोधनात डॉक्टरांना कोरोना रुग्णांच्या लक्षणांची 6 क्लस्टर्स सापडली आहेत. त्यात कोरोनाची सर्व लक्षणे आढळून येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
ऑगस्टमध्ये भारतात सर्वात जास्त नवे कोरोना रुग्ण; ब्राझील, अमेरिकेलाही टाकलं मागे
ताप आल्यासारखं जाणवतं पण अंग गरम होत नाही, वारंवार ताप येणं, पोटाचे विकार उद्भवणे हे तीन पहिले क्लस्टर आहेत.
तर उरलेल्य क्लस्टर्समध्ये थकव्याचे तीन प्रकार आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पहिल्या प्रकारामध्ये – किंचित ताप, डोकं दुखणं, कफ, वास न येणं छातिमध्ये दुखणं आणि थकवा जाणवतो
दुसऱ्या प्रकारामध्ये – या लक्षणांशिवाय भूक लागत नाही आणि स्नायू दुखायला लागतात.
तिसऱ्या प्रकारामध्ये – ही सगळी लक्षणे आणि श्वास घ्यायला त्रास होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
ब्रिटन आणि अमेरिकेतल्या 2 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टरांनी लक्षणांची सहा विभागात विभागणी केली आहे.
जगातल्या अनेक देशांमध्ये वेग वेगळी लक्षणे दिसत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच उपचार व्हायला पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं.
जस जसा कोरोना रुग्णांचा अभ्यास होत जाईल तसं नवीन माहिती उपलब्ध होणार आहे. त्याप्रमाणे जगभरातल्या डॉक्टरांनी आपली उपचाराची दिशा ठरवली पाहिजे असा सल्लाही डॉक्टरांनी दिलाय.