COVID-19: राज्यात आज उच्चांकी 12 हजार 822 नव्या रुग्णांची भर, एकूण संख्या गेली 5 लाखांवर

COVID-19: राज्यात आज उच्चांकी 12 हजार 822 नव्या रुग्णांची भर, एकूण संख्या गेली 5 लाखांवर

राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही आता 5 लाख 3 हजार 084 एवढी झाली आहे.

  • Share this:

मुंबई 8 ऑगस्ट: राज्यात आज उच्चांकी नव्या रुग्णांची भर पडली आहे.  आज तब्बल 12822 नवीन रुग्ण आढळून आलेत. 275 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के इतका एवढा झाला आहे. राज्यात आज 11081 रुग्णांना घरी डिस्चार्ज दिला, आत्तापर्यंत 3 लाख 38 हजार 362 रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67. 26 टक्के इतके आहे. राज्यात आज एक लाख 47 हजार 48 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण 41 हजार 266 पुणे येथे असून त्यानंतर  22943 ठाणे येथे आहेत. राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही आता 5 लाख 3 हजार 084 एवढी झाली आहे.

राज्यात सध्या नऊ लाख 89 हजार 612 व्यक्ती स्वतंत्र विलगीकरण असून 35 हजार 626 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरन मध्ये आहेत. मुंबई 19900 14 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच काही दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशाचा रिकव्हरी रेटही वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गरीबांसाठी आलेल्या जीवनावश्यक वस्तूवर नगराध्यक्षासह नगरसेवकांचा डल्ला

तर देशातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही कमी करण्यात यश मिळालं असून त्याची टक्केवारी 2.04 एवढी झाली आहे.

दरम्यान, भारतात सध्या बायोटेक कंपनीच्या लशीची चाचणी सुरू आहे. तर ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. कोरोनावरची लस भारतात उपलब्ध व्हावी यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. ही लस प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार काय आणि कशी योजना तयार करत आहे जाणून घ्या.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार यावेळी भारत सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखण्याचं काम सुरू आहे. याशिवाय वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, विविध संस्थांचे अधिकारी यांच्यासोबत बैठक सुरू आहे. ही लस कशी प्रत्येक भागात आणि घरात पोहोचवता येईल यासंदर्भात विविध स्तरावर चर्चा सुरू आहे.

Big News: रविवारी 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार प्रत्येकी 2 हजार

लस तयार झाल्यानंतर लोकांना लस कशी उपलब्ध करून द्यावी याबाबत काम सुरू आहे. कोणत्या प्रकारचे कोल्ड स्टोरेज ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ, अमेरिकेतील मॉडर्ना लस उणे 70 अंश सेल्सिअस ठेवणे आवश्यक आहे, परंतु ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि भारत बायोटेकमध्ये असे नाही. या व्यतिरिक्त ही समिती प्रथम लसीचा डोस कोणाकडून दिला जाईल यावरही विचार करत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 8, 2020, 7:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading