COVID-19: राज्यात आजही आढळले विक्रमी संख्येत नवे रुग्ण, एकूण आकडा 5 लाख 72 हजारांवर

COVID-19: राज्यात आजही आढळले विक्रमी संख्येत नवे रुग्ण, एकूण आकडा 5 लाख 72 हजारांवर

राज्यात 1,51,555 Active रुग्ण आहेत. तर 4,01,442 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत.

  • Share this:

मुंबई 14 ऑगस्ट:  राज्यात विक्रमी संख्येने नवे रुग्ण आढळण्याचा क्रम आजही कायम आहे. आज 12,608 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 364 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 5,72,734 एवढी झालीय तर मृत्यू संख्या 19,427वर पोहचली आहे. आज 10,484 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. राज्यात 1,51,555 Active रुग्ण आहेत. तर 4,01,442 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत.

मुंबईत आता 7 हजार कोविड पॉसिटीव्ह असलेल्या प्रभागांची संख्या 4 झाली आहे. अंधेरीत पाश्चिमेत एकूण 7017 कोरोनाबाधित आहेत. त्यानंतर रुग्णसंख्येनुसार के पूर्व, पी उत्तर, जी उत्तर आणि त्यानंतर के पश्चिमेचा समावेश होतो. सगळ्यात जास्त रुग्ण हे के पूर्व मध्ये 7895 आहेत तर पी उत्तर—7577, जी उत्तर 7453, तर के ईस्ट--7017 आहेत

आतापर्यंत मुंबईत 1 लाख 27 हजार 571 कोरोनाबाधित आहेत. तर 6620 जणांचा मृत्यू झालाय.

दरम्यान, रशियाने तयारकेलेल्या लशीवर भारताने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जगातील सर्वात पहिली कोरोना लस (russian corona vaccine) तयार केली आहे. त्यामुळे लशीची प्रतीक्षा करणाऱ्या कित्येकांना आता आशेचा किरण दिसू लागला आहे. रशियाने आपल्याला अनेक देशांनी या लशीच्या डोससाठी ऑर्डर दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भारतातही ही लस दिली जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रशियाने तयार केलेल्या कोरोना लशीला स्पुतनिक व्ही (Sputnik V) असं नाव दिलं आहे.  या लशीसाठी 20 पेक्षा अधिक देशांकडून अब्जावधी डोसच्या ऑर्डर आल्या आहेत. त्यात भारताचही समावेश आहे. असं रशियाने याआधी सांगितलं आहे.

मात्र चाचण्या पूर्ण न झाल्याने  लशीच्या सुरक्षिततेबाबत जागतिक आरोग्य संघटनेनंही प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. त्यामुळे सर्व निकष गांभीर्याने तपासूनच ही लस भारतात दिली जाईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 14, 2020, 8:31 PM IST

ताज्या बातम्या