राज्यात ‘कोरोना’मुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं, Recovery Rate पोहोचला 80 टक्क्यांवर

राज्यात ‘कोरोना’मुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं, Recovery Rate पोहोचला 80 टक्क्यांवर

राज्यात दिवसभरात 10 हजार 244 नवीन रुग्णांचे निदान झाले. तर 263 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 एवढा झाला आहे.

  • Share this:

मुंबई 05 ऑक्टोबर: कोरोना विरुद्ध निकराची झुंज देणाऱ्या महाराष्ट्रात दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नव्या पेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढल्याने राज्याचा Recovery Rate हा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी 12 हजार 982 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे  राज्यात आजपर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 62 हजार 585 एवढी झाली आहे.

राज्यात दिवसभरात 10 हजार 244 नवीन रुग्णांचे निदान झाले. तर 263 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 एवढा झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 71 लाख 69 हजार 887 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 14 लाख 53 हजार 653 म्हणजे 20 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या एकूण 2 लाख 52 हजार 277 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना इतकेच भयंकर आहेत 'हे' 4 आजार, घेतला कोट्यावधी लोकांचा जीव

दरम्यान, देशात सुरू असलेल्या Unlockच्या प्रक्रियेनुसार देशात शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली होती. आता 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी शिक्षण मंत्रालयाने सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपले वेगळे नियम करू शकतात असं सांगत नव्या नियमांमध्ये अनेक अटीही टाकण्यात आल्या आहेत.

देशात गेल्या 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक

शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी तो निर्णय हा सक्तीचा नाही. राज्ये आपल्या राज्यात असलेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर पालकांची लेखी परवानगी घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल. मुलांना शाळेत येणं हे बंधनकारक नाही. मुलं घरी राहून Online माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात असंही या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 5, 2020, 7:50 PM IST

ताज्या बातम्या