दिलासा देणारी बातमी, राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 70 टक्क्यांवर

दिलासा देणारी बातमी, राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 70 टक्क्यांवर

रिकव्हरी रेट चांगला असला तरीही दर दिवसाला कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याचं प्रमाण मात्र जास्त आहे.

  • Share this:

मुंबई 16 ऑगस्ट: आजही राज्यात नव्याने 11 हजार 111 कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर 288 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने 10 हजारांच्या वरच रुग्णांची दररोज भर पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 8836 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे 70 टक्क्यांवर गेलं असून मृत्यू दर 3.36 टक्क्यांवर आला आहे. तर कोविड रुग्णांची एकूण संख्या ही 5,95,865 एवढी झाली आहे.

भारतात रिकव्हरी रेट चांगला असला तरीही दर दिवसाला कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याचं प्रमाण मात्र जास्त आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 लाख 89 हजार 682 वर पोहोचला आहे.

24 तासांत तब्बल 63 हजार 489 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 944 रुग्णांचा कोरोनामुळे भारतात मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाच्या 6 लाख 77 हजार 444 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत मृतांचा आकडा 50 हजाराच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 944 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 49,980 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जगात भारताचा तिसरा तर देशात महाराष्ट्राचा कोरोनाच्या रुग्णांमध्ये पहिला क्रमांक आहे.

कोरोनातून आतापर्यंत बरे होणाऱ्यांची एकूण संध्या 18 लाख 62 हजार 258 आहे. सलग 12 दिवस कोरोनाच्या नवीन रुग्णांची आकडेवारी ही रेकॉर्डब्रेक आहे. इतर देशांच्या तुलनेत ही आकडेवारी खूप जास्त असल्याचं एका अहवालानुसार सांगण्यात आलं आहे. तर भारतात मृत्यूदर कमी झाला आहे. 1 ते 15 ऑगस्टपर्यंत केवळ दोनच दिवसांत मृत्यूदराची सर्वाधिक नोंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 16, 2020, 7:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या